शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कंटेनरची कारला धडक, तीनजण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 18:50 IST

नगरकडे जाणाऱ्या कारला नगर-औरंगाबाद महामार्गावरील बजाज मटेरियल गेटसमोर कंटेनरने जोरदार धडक दिली. यात कारमधील पाचपैकी तिघांची प्रकृती गंभीर असून, दोघे किरकोळ जखमी आहेत.

वाळूज महानगर : नगरकडे जाणाऱ्या कारला नगर-औरंगाबाद महामार्गावरील बजाज मटेरियल गेटसमोर कंटेनरने जोरदार धडक दिली. यात कारमधील पाचपैकी तिघांची प्रकृती गंभीर असून, दोघे किरकोळ जखमी आहेत. ही घटना शुक्रवारी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास घडली.

गंगापूर तालुक्यातील शिवराई येथील संजय गोविंद साबळे, केशव गिरीजाराम साबळे, हरिभाऊ तुकाराम साबळे, मच्छिंद्र सखाराम साबळे व गोरख भावराव नेव्हाळ हे माहुरदेवीच्या दर्शनासाठी शुक्रवारी सकाळी ५ वाजेच्या सुमारास कारने निघाले. औरंगाबाद-नगर महामार्गावरुन माहुरकडे जात असताना बजाज आॅटो कंपनीच्या मटेरियल गेटसमोर कंटनेरने बजाज कंपनीकडे जाण्यासाठी अचानक वळण घेतले. याचवेळी कारला जोराची धडक बसली.

यात कार चालक संजय गोविंदराव साबळे (४०), गोरख भावराव नेव्हाळ (४५), केशव गिरीजाराम साबळे (४५), हरिभाऊ पुंजाराम साबळे (६०) व मच्छिंद्र सखाराम साबळे (५०) हे गंभीर जखमी होऊन कारमध्ये अडकले होते. जखमींना रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल केले. सहायक फौजदार आर.डी.वडगावकर, पोहेकॉ.काकासाहेब जगदाळे यांनी घटनास्थळ गाठुन अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरुन हटवून वाहतूक सुरळीत केली.

अपघात सत्र सुरुचऔरंगाबाद-नगर महामार्गावर अपघात सत्र सुरुच असल्याने वाहनधारक व नागरिकात भितीचे वातावरण पसरले आहे. गुरुवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास पंढरपूरातील तिरंगा चौकात अज्ञात वाहनाच्या धडकेने पादचारी ठार झाला आहे. त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. या महामार्गावर दुतर्फा जडवाहने उभी राहत असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून लहान-मोठे अपघात सतत घडत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातWaluj MIDCवाळूज एमआयडीसी