शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
2
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
3
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
4
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
5
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
6
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
7
Operation Sindoor : जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
8
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
9
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
10
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
11
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
12
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
13
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
14
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
15
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
16
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
17
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
18
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
19
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
20
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  

ग्राहकांना ३०० युनिट वीज मिळणार मोफत, निकष काय?

By साहेबराव हिवराळे | Updated: June 20, 2024 19:49 IST

शहरात अनेक नागरिकांनी ऑनलाइन अर्ज केले असून, नागरिकांना प्रकल्प बसवून दिल्याची माहिती महावितरणने दिली.

छत्रपती संभाजीनगर : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत बिजली योजनेंतर्गत ग्राहकांना ३०० युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाते. महत्त्वाची बाब म्हणजे यासाठी केवळ अर्ज करणाऱ्या नागरिकांचे आरसीसी घर असावे, एवढीच अट आहे.

या उपक्रमांतर्गत १ किलो, २ किलो व ३ किलोवॅट या सिस्टीमला अनुदान दिले जात असून, ग्राहकांनी नॅशनल पोर्टल या साइटवर ऑनलाइन पद्धतीने किती वॅटचा प्रकल्प घ्यायचा आहे, या माहितीसह अर्ज करायचा आहे. अर्ज केल्यानंतर संबंधित महावितरण कार्यालयाला याची माहिती पोर्टलद्वारे येऊन पुढील कार्यवाही गुत्तेदारामार्फत होईल. शहरात अनेक नागरिकांनी ऑनलाइन अर्ज केले असून, नागरिकांना प्रकल्प बसवून दिल्याची माहिती महावितरणने दिली.

कोणाला लाभ मिळणार?कोणत्याही वर्गातील नागरिकांना यात सहभाग घेता येईल. यासाठी नॅशनल पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, या प्रकल्पाला बसविण्यात आलेल्या प्लेटची १५ ते २० दिवसांतून एकदा स्वच्छता करावी लागेल. प्रकल्प घेतल्यास १ किलोवॅटला ३० हजार, २ किलोवॅटला ६० हजार रुपये व ३ किलोवॅटला ७८ हजार रुपये एवढे अनुदान मिळणार आहे. तीन किलोवॅटपेक्षा जास्त प्रकल्पासाठी ग्राहकांनी अर्ज केल्यास त्यालाही ७८ हजार रुपयांचे शासनाचे अनुदान आहे.

निकष काय?बाकी कसलेही निकष नाहीत. केवळ प्रकल्प घरावर बसविण्यासाठी आरसीसीचे घर हवे. प्रकल्प बसवल्यानंतर या प्रकल्पाला दोन मीटर असणार आहेत. एका मीटरने विद्युत पुरवठा वापर कळणार असून, दुसरा मीटर महावितरण कंपनीला किती विद्युत पुरवठा प्रकल्पाद्वारे दिला, याची माहिती ग्राहकांना मिळेल.

नागरिकांनी लाभ घ्यावा...नागरिकांचा दुहेरी फायदा आहे. घरावर बसवलेल्या प्रकल्पाने वापराव्यतिरिक्त जास्त विद्युत पुरवठा तयार केल्यास तो विद्युत पुरवठा महावितरणला बसवलेल्या मीटरद्वारे विकत देता येणार आहे. यामुळे या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी फायदा घ्यावा.- सुनील जाधव, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादelectricityवीज