शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पैठणकरांना दिलासा; नियम व अटीसह विविध दुकाने सुरु करण्यास परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 19:49 IST

पैठण शहरातील विविध क्षेत्रातील व्यापारी अस्थापना सुरू करण्या बाबत तहसील, पोलीस व नगर परिषद प्रशासनाची आज बैठक झाली.

ठळक मुद्देही सर्व दुकाने शुक्रवारी बंद राहणार दुकानाची वेळ सकाळी ७ ते १२ अशीच असेल

पैठण : शहरात विविध प्रकारची दुकाने सोशल डिस्टन्सिंगचे नियम व अटी पाळून निर्धारीत वेळेत सुरू ठेवण्यास प्रशासनाने आज पासून परवानगी दिली आहे. मात्र, कोरोना संसर्गास कारणीभूत ठरतील अशा दारू, तंबाखू व सलूनच्या दुकानावरील बंदी कायम ठेवण्यात आली आहे. विविध दुकाने सुरू होणार असल्याने शहरातील व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, जे दुकानदार  नियमाचे पालन करणार नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा ईशारा मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी दिला आहे.

पैठण शहरातील विविध क्षेत्रातील व्यापारी अस्थापना सुरू करण्या बाबत तहसील, पोलीस व नगर परिषद प्रशासनाची आज बैठक झाली. बैठकीसाठी तहसीलदार चंद्रकांत शेळके, पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख व नगर परिषद मुख्याधिकारी सोमनाथ जाधव आदी अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत दर शुक्रवारी संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरातील कोणत्या दुकाना कोणत्या वारास सुरू राहतील या बाबत पुढील निर्णय घेण्यात आला.

सोमवार व मंगळवार - रेडिमेड, कापड दुकान, टेलर, फूट वेअर, वॉच, लॉंड्री.

बुधवार व गुरूवार - ईलेक्ट्राँनिक, ईलेक्ट्रीकल, मोबाईल, चष्मा, स्टेशनरी, टेलरिंग मटेरियल, बुक स्टॉल, लेडीज शॉपी, कॉस्मेटिक, फर्निचर, झेरॉक्स, फोटो स्टुडिओ, अगरबत्ती व कलर दुकाने सुरू राहतील.

शनिवार व रविवार - सोनार, ज्वेलर्स, भांडे, आतार, मनियार, बांगडी, सायकल, फरसान, मिठाई, 

सोमवार ते रविवार ---हार्ड वेअर, गँरेज, अँटोमोबाईल, बांधकाम मटेरियल, पंम्चर दुकाने, कुशन, डिजिटल फ्लेक्स, भाजीपाला, बेकरी, फळे, फुलाचे दुकान, चिकन,  मटन, मासे, दूध, किराणा अशा सर्व दुकाना सुरू राहणार आहेत.

दरम्यान, ही सर्व दुकाने शुक्रवारी बंद राहणार असून दुकानाची वेळ सकाळी ७ ते १२ अशीच राहणार आहे. कृषी सेवा दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उघडी ठेवता येणार आहेत. सर्व दुकानदारांनी सोशल डिस्टन्सिंग नियम पाळून व्यापार करावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादMarketबाजार