शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

पैठणकरांना दिलासा; बाधित ब्रदरच्या संपर्कात आलेले रुग्णालयातील ३९ जण निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 18:30 IST

रूग्णालयातील कर्मचाऱ्यांचा अहवाल प्राप्त होईपर्यंत संपूर्ण पैठण शहराची धाकधूक वाढली होती.

पैठण : शासकीय रूग्णालयातील कोरोना पॉझिटिव्ह परिचारक ( ब्रदर ) च्या प्रथम संपर्कात आलेल्या रूग्णालयातील ३९ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल आज निगेटिव्ह आला आहे. रूग्णालयातील कर्मचाऱ्यांचा अहवाल प्राप्त होईपर्यंत संपूर्ण पैठण शहराची धाकधूक वाढली होती. परंतु, आज अहवाल आल्यानंतर शहरवाशीयांचा जीव भांड्यात पडला.

औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ग्रामीण प्रशिक्षण पथक पैठण रूग्णालयातील एका परिचारकाचा कोरोना चाचणी अहवाल गुरूवारी पॉझिटिव्ह आला होता. दरम्यान सदर बाधित ब्रदर पैठण येथील रूग्णालयातून दि १५ रोजी कर्तव्य बजावून औरंगाबाद येथे गेला होता, त्या नंतर मात्र तो परत रूग्णालय आला नव्हता. परंतु, त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याने  रूग्णालय प्रशासन व पैठण शहरात मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान गुरूवारी रूग्णालयातील ३९ अधिकारी, कर्मचारी व डॉक्टरांचे स्वँब घेउन ते विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. आज दुपारी या ३९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. अहवाल निगेटिव्ह येताच कालपासून रूग्णालय परिसरात व शहरात निर्माण झालेले  तनावाचे वातावरण एकदम बदलले. दरम्यान नगर परिषदेच्या वतीने पैठण शासकीय रूग्णालय व नाथमंदिर परिसरातील भक्त निवासाचे आज पुन्हा निर्जंतुकीकरण करण्यात आले.

नागरिकांनी घाबरू नयेपैठण शहरातील रूग्णालयात सुरक्षेचे निकष  पाळून कामकाज करण्यात येत आहे. रूग्णालयात येणारे ईतर रूग्ण व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेस प्रथम प्राधान्य आहे. रूग्णालयातील सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले असून नागरिकांनी  काळजी घ्यावी व कोरोना महामारीच्या या लढ्यात आरोग्य विभागास सहकार्य करावे असे आवाहन रूग्णालयाच्या प्रपाठक डॉ सीमा माळी यांनी आज केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद