शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना दिलासा ! जायकवाडी धरणातून चणकवाडी बंधाऱ्यासाठी गोदावरी पात्रात पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 18:54 IST

Water was released from Jayakwadi dam जायकवाडी प्रकल्पावरील जलविद्युत प्रकल्प गेल्या सहा महिण्यापासून बंद असल्याने गोदावरी पात्र व चणकवाडी बंधारा कोरडा पडला होता.

ठळक मुद्देजायकवाडी धरणाचे दोन दरवाजे अर्धा फुटाने वर उचलून १०४८ क्यूसेक्स क्षमतेने गोदावरी पात्रात विसर्ग करण्यात आला. आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यातही पाणी सोडण्याबाबत पाटबंधारे विभागाने जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव

पैठण : शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत मंगळवारी दुपारी जायकवाडी धरणातून  चणकवाडी बंधाऱ्यासाठी गोदावरी पात्रात पाणी सोडण्यात आले. धरणातून पाणी सोडावे म्हणून शेतकऱ्यांचा गेल्या २५ दिवसा पासून कागदोपत्री पाठपुरावा प्रशासनाकडे सुरू होता. पाणी सुटल्याने चणकवाडी बंधाऱ्याच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांंना मोठा दिलासा मिळाला आहे.

आज दुपारी जायकवाडी धरणाचे दोन दरवाजे अर्धा फुटाने वर उचलून १०४८ क्यूसेक्स क्षमतेने गोदावरी पात्रात विसर्ग करण्यात आला. सध्या धरणात  ६६.३८ टक्के जलसाठा शिल्लक असून धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातूनही शेतीसिंचनासाठी पाण्याचे आवर्तन सुरु आहे. मंगळवारी शेतकरी चंद्रकांत झारगड यांच्या उपस्थितीत उपअभियंता ज्ञानदेव शिरसाट, सहायक अभियंता संदिप राठोड, गणेश खराडकर, राजाराम गायकवाड, रामनाथ तांबे, शेषराव आडसूल, अब्दुल बारी गाजी यांनी धरणातून पाणी सोडण्याची प्रक्रिया पार पाडली. दरम्यान आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यातही पाणी सोडण्याबाबत पाटबंधारे विभागाने जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवला असून जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेनंतर या बंधाऱ्यात पाणी सोडण्याचा निर्णय होईल असे या वेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.

जलविद्युत प्रकल्प सुरू असल्यास धरणाच्या खाली असलेल्या चणकवाडी बंधाऱ्यात विद्युत निर्मिती नंतर सुटलेले पाणी जमा होते. परंतु जायकवाडी प्रकल्पावरील जलविद्युत प्रकल्प गेल्या सहा महिण्यापासून बंद असल्याने गोदावरी पात्र व चणकवाडी बंधारा कोरडा पडला होता. परिसरातील अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजना व शेती सिंचनासाठी बंधाऱ्यातून शेतकऱ्यांनी पाईपलाईन केलेल्या आहेत. यामुळे परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली होती. जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी चंद्रकांत झारगड व परिसरातील शेतकऱ्यांचा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू होता.दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका संपर्क प्रमुख दत्ता गोर्डे,  तालुकाध्यक्ष आप्पासाहेब निर्मळ यांनी शेतकऱ्यांची समस्या उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या समोर मांडून पाणी सोडण्याचा निर्णय करून घेतला असे शेतकरी चंद्रकांत झारगड यांनी सांगितले.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबाद