शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

समृद्धी महामार्गाच्या कनेक्टिव्हिटीचा तिढा सुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2022 09:33 IST

समृद्धी महामार्गाने दिलेल्या रकमेएवढाच भूसंपादनाचा मावेजा मिळावा, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्यामुळे या महामार्गाला ‘डीएमआयसी’ची कनेक्टिव्हिटी देण्याचा वाद चिघळला आहे.

- विजय सरवदेलोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : समृद्धी महामार्गाने दिलेल्या रकमेएवढाच भूसंपादनाचा मावेजा मिळावा, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्यामुळे या महामार्गाला ‘डीएमआयसी’ची कनेक्टिव्हिटी देण्याचा वाद चिघळला आहे. तर, जानेवारीअखेरपर्यंत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होईल, असा विश्वास एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. यासाठी एमआयडीसीला एकूण ८ एकर भूसंंपादन करावे लागणार आहे. समृद्धी महामार्गावर इंटरचेंज उभारणीच्या कामासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला  एमआयडीसीकडून ४१.१४ कोटींची आगाऊ रक्कम प्राप्त झाली आहे.

प्राप्त रकमेतून ‘एमएसआरडीसी’कडून समृद्धी महामार्गावर केवळ इंटरचेंज उभारले जाणार आहे. इंटरचेंजपासून शेंद्रा औद्योगिक वसाहतीपर्यंत जवळपास ९०० मीटर लांबीचा रस्ता एमआयडीसीला करावा लागणार आहे. इंटरचेंजसाठी ४ एकर आणि रस्त्यासाठी ४ एकर असे एकूण ८ एकर भूसंपादन एमआयडीसीला करावे लागणार आहे. समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन करताना एमएसआरडीसीने शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा पाचपट मावेजा दिला होता. तेवढाच मावेजा एमआयडीसीने द्यावा, या मुद्द्यावर शेतकरी अडले आहेत. तथापि, एमआयडीसीने शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या असून त्यावर हरकती, मागविण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. 

कनेक्टिव्हिटी गरजेची    ‘डीएमआयसी’ या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीकडे बहुराष्ट्रीय कंपन्यांना आकर्षित करायचे असेल, तर दळणवळणाची सुविधा उत्तम  हवी. यासाठी औरंगाबादेत आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झाली पाहिजे. समृद्धी महामार्गाला ‘डीएमआयसी’ची कनेक्टिव्हिटी असावी, अशी उद्योग संघटनांची अपेक्षा आहे.  

वाहतुकीला व्यत्यय नाही‘एमआयडीसी’कडून इंटरचेंज उभारणीचे काम पूर्ण होईल. तत्पूर्वी, जर या महामार्गावरून वाहतूक सुरू झाली, तरीही  कनेक्टिव्हिटीच्या कामाचा अडथळा येणार नाही. मात्र, इंटरचेंज व एमआयडीसीच्या पोहोच रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतरच समृद्धी महामार्गावरून ‘डीएमआयसी’ची वाहतूक सुरू होईल.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग