शहरं
Join us  
Trending Stories
1
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
2
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
3
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
4
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
5
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
6
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
7
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
8
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
9
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
10
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
11
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
12
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
13
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
14
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
15
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
16
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
17
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
18
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
19
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
20
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...

भाडेवाढीविरोधात कॉंग्रेसचे रेलरोको

By admin | Updated: June 26, 2014 00:39 IST

नांदेड : केंद्रातील भाजपा आघाडीच्या शासनाने रेल्वे भाड्यात प्रचंड वाढ केल्याच्या निषेधार्थ भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या वतीने नांदेड शहर रेल्वेस्थानकासह भोकर, उमरी, हिमायतनगर, किनवट

नांदेड : केंद्रातील भाजपा आघाडीच्या शासनाने रेल्वे भाड्यात प्रचंड वाढ केल्याच्या निषेधार्थ भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या वतीने नांदेड शहर रेल्वेस्थानकासह भोकर, उमरी, हिमायतनगर, किनवट आदी ठिकाणी आंदोलन करण्यात आले. नांदेडमध्ये आंदोलन करणाऱ्या १४ जणांविरूद्ध रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केले आहेत़नांदेड रेल्वेस्थानकावर बुधवारी सकाळी १० वाजता काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलनास प्रारंभ केला़ मुंबईकडे जाणाऱ्या तपोवन एक्स्प्रेसला कार्यकर्त्यांनी रेल्वेस्थानकावर अडवून ठेवले़ रेल्वे भाडेवाढीचा थेट फटका हा सामान्य रेल्वे प्रवाशांवर होणार असून ही भाडेवाढ मागे घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली़ या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी़ आऱ कदम, शहराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, महापौर अब्दूल सत्तार, जि़ प़ अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, आ़ ओमप्रकाश पोकर्णा, उपमहापौर आनंद चव्हाण, महापालिका स्थायी समितीचे सभापती उमेश पवळे, माजी महापौर बलवंतसिंघ गाडीवाले, जि़ प़ च्या समाजकल्याण सभापती मंगाराणी अंबुलगेकर, महिला आघाडीच्या सुमती व्याहाळकर, नांदेड पंचायत समितीचे सभापती बंडू पावडे, नगरसेवक नवल पोकर्णा, संजय मोरे, विनय पाटील गिरडे, अ‍ॅड़ निलेश पावडे, जि़ प़ सदस्य बाबू गिरे, संतोष पांडागळे, डॉ़ श्याम पाटील तेलंग, केदार पाटील साळुंके, पप्पू पाटील कोंढेकर, मंगला धुळेकर, अनिता इंगोले, नगरसेविका करूणा जमदाडे, ललिता शिंदे, महादेवी मठपती, छाया कळसकर, पद्मा झंपलवार, अंजली मोरे आदींची उपस्थिती होती़ जवळपास एक तास चाललेल्या या आंदोलनामुळे तपोवन एक्स्प्रेस जवळपास अर्धा तास उशिराने धावली़ रेल्वे पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कदम यांच्यासह १३ जणांविरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत़ भोकर येथे आंदोलनभोकर- येथे सकाळी १०़३० वाजता झालेल्या आंदोलनात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जगदीश पाटील भोसीकर, नगराध्यक्ष विनोद चिंचाळकर, नागनाथ घिसेवाड, गोविंद पाग़ौड, सुभाष पा़किन्हाळकर, जि़प़सदस्या भारतीबाई पवार, शिवाजी पांचाळ, करीम बागवान, जवाजोद्दीन बरबडेकर, केशव मुद्देवाड, दिलीप सोनटक्के, मिर्झा बेग, डॉ़विजयकुमार दंडे, रामचंद्र मुसळे, डॉ़पुरूषोत्तम कल्याणकर यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते़ हिमायतनगरात निवेदनहिमायतनगर : रेल्वे तिकीटातील भाववाढीच्या विरोधात तालुका काँग्रेसच्या वतीने स्टेशन मास्तर यांना तालुका काँग्रेस अध्यक्ष जनार्दन ताटेवाड, मार्केट कमिटीचे सभापती दत्तराम पा़ करंजीकर, तायुकाँ अध्यक्ष विकास पाटील, माजी जि़प़ सदस्य समदखानसह काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले़ रेल्वे तिकीट भाववाढ रद्द करण्याची मागणी करण्यात आली़ निवेदनावर माजी जि़ प़ सदस्य समदखान, तालुका काँग्रेस अध्यक्ष जनार्दन ताडेवाड, मार्केट कमिटीचे सभापती दत्तराम पा़ करंजीकर, संजय माने, तायुकाँ अध्यक्ष विकास पाटील, दिलीप शिंदे, अ़ मन्नान, अखिलसेठ, सरपंच संघटनेचे अध्यक्ष नितीन कुंभेकर, सुनील चव्हाण, हातमोडे आदींच्या सह्या आहेत़उमरीत आंदोलनउमरी : बुधवारी सकाळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी रेल्वेच्या दरवाढीचा येथील रेल्वे स्थानकात घोषणाबाजी करून तीव्र निषेध केला़ मुंबई-सिकदंराबाद देवगिरी एक्स्प्रेस स्थानकात आली असता स्टेशन मास्तराच्या कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली़ जाहीर केल्यानुसार रेल रोको आंदोलन मात्र केले नाही़ स्टेशन मास्तर निवृत्ती सोनटक्के यांना निवेदन देण्यात आले़ यावेळी ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते लिंगराम पाटील कवळे, बालाजीराव वाघमारे, संजय कुलकर्णी, व्यंकटराव कांगठे, माजी नगरसेवक गजानन श्रीरामवार, शहराध्यक्ष किशोर पबितवार, मोहनराव पवळे, शंकर खांडरे,परमेश्वर मुदीराज, दासराव शिंदे, साईनाथ मुरकुटवार, शंकर कोसबतवार, मारोती भुजबळे, धोंडू पेनेवार, सतीश चव्हाण, राम जाधव, विजय चिंतावार, साईनाथ उडतेवार, कैलास शर्मा, शेख शकील आदींची उपस्थिती होती़ किनवट येथे रेल रोकोकिनवट : येथे कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी विविध घोषणा देवून रेल्वे रोको आंदोलन केले. आंदोलनात माजी आ. भीमराव केराम, माजी जिल्हाध्यक्ष नामदेवराव केशवे, तालुकाध्यक्ष नारायणराव सिडाम, सरचिटणीेस गंगन्ना नेमान्नीवार, दत्तराम गेडाम, प्रफुल्ल राठोड, व्यंकटराव नेम्माणीवार, मतीन कुंदन, सुरेखाताई काळे, गंगूबाई परेकार, अ‍ॅड. शंकर राठोड, काझी नईमोद्दीन बडगुजर, बालाजी बादड, आशीष कऱ्हाळे, सीराज जीवाणी, समशेर खिच्ची, निर्मला शिनगारे, लक्ष्मीपती दोनपेल्लीवार, शेख शहनाज शे शम्मू, रहेमतुल्ला, चव्हाण, माधव खेडकर, वच्छलाताई भुरके आदींची उपस्थिती होती. (वार्ताहर)