शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भाजप विरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 00:27 IST

सत्तेवर येऊन तीन वर्षे झाल्यानंतरही भाजप सरकारने निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही़़ राज्यातही हिच परिस्थिती आहे़ सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले असून, या सरकार विरुद्ध जनआक्रोश सप्ताह पाळला जात आहे़ या अंतर्गत बुधवारी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सत्तेवर येऊन तीन वर्षे झाल्यानंतरही भाजप सरकारने निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही़़ राज्यातही हिच परिस्थिती आहे़ सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले असून, या सरकार विरुद्ध जनआक्रोश सप्ताह पाळला जात आहे़ या अंतर्गत बुधवारी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले़सत्ता आल्यानंतर राज्यात एकाही शेतकºयाची आत्महत्या होऊ देणार नाही, कोरडवाहू शेतीत ठिबक सिंचनासाठी ९० टक्के अनुदान देऊ, प्रत्येक शेतकºयाच्या शेतात वीज, पाणी देऊ, शेतमालाला ५० टक्के नफा मिळेल, अशी व्यवस्था करू, आदी आश्वासने भाजपाने निवडणुकीपूर्वी दिली होती़ मात्र तीन वर्षांचा कालखंड उलटूनही या आश्वासनांची पूर्तता झाली नाही़ राज्यात १२ हजारांपेक्षा अधिक शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत़ जीएसटीमुळे शेती आवजारांच्या किंमती वाढल्या़ शेतकºयांना ५० टक्के नफा तर सोडाच परंतु, हमीभावही मिळत नाही़या सर्व पार्श्वभूमीवर सरकार अपयशी ठरले असून, या सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी बुधवारी काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले़ काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर यांच्यासह शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, माजी खा़ तुकाराम रेंगे, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ हत्तीअंबिरे, इरफानूर रहेमान, रवि सोनकांबळे, जयश्रीताई खोबे, अब्दुल सईद, बाळासाहेब देशमुख, नगरसेवक सुनील देशमुख, सचिन देशमुख, अमानउल्ला खान, सालेह चाऊस, पंजाबराव देशमुख, युवक काँग्रेसचे लोकसभा अध्यक्ष नागसेन भेरजे, बंडू पाचलिंग, अ‍ॅड़ हनुमंत जाधव, सचिन जवंजाळ, सुरेश काळे, अतिक उर रहेमान, सुहास पंडीत, मलेका गफार, जानूबी, पठाण दुर्राणी खानम, वंदना पवार, जयश्री जाधव, रत्नमाला शिंगणकर, इरफान मलीक, मिनहाज कादरी आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते़