वसमत : येथील बगाडी परिसरात रविवारी काँग्रेस कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात नूतन शहराध्यक्ष अजगर पटेल यांचा सत्कार करण्यात आला. आगामी नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसमत शहरात वार्ड तेथे काँग्रेसची शाखा स्थापन करण्याचा निर्धार शहराध्यक्षांनी व्यक्त केला. वसमत शहर काँग्रेस कमेटीच्या वतीने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. मेळाव्यासाठी माजी नगराध्यक्ष अ.हफीज अ. रहेमान, अॅड. शेख म. हारूण, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष शमीम सिद्धीकी, मंजूर मौलाना, नगरसेवक राहूल उबारे, म. वसीम, फेरोज पठाण, हारूण दालवाले आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमात नवनिर्वाचित शहराध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना अ.हफीज अ. रहेमान यांनी काँग्रेस पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी नूतन शहराध्यक्षांनी कामाला लागण्याचे आवाहन केले. शहराध्यक्ष अजगर पटेल यांनी वार्ड तेथे काँग्रेस शाखा स्थापन करून निष्ठावान कार्यकर्त्यांना पदावर नियुक्ती करण्यात येणार असल्याचे सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेख महेबुब, शेख जलील, अ. सत्तार, हाजी फेरोज, शेख खयूम आदींसह काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)कार्र्यकर्त्यांना आवाहनआगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी नूतन शहराध्यक्षांनी कामाला लागण्याचे कार्यकर्त्यांना केले आवाहन.
काँग्रेस कार्यकर्ता मेळावा
By admin | Updated: June 17, 2014 00:38 IST