शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस असो की राष्ट्रवादी; खैरेंचा पराभव अटळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 23:47 IST

देशात नुकत्याच जाहीर झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला धक्का बसला आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात उमेदवार काँग्रेसचा असो की राष्ट्रवादी काँग्रेसचा विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव अटळ असल्याचा दावा मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केला.

ठळक मुद्देसतीश चव्हाण यांचा दावा : लोकसभा निवडणुकीत जातीय, धार्मिक विद्वेष चालणार नाही

औरंगाबाद : देशात नुकत्याच जाहीर झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला धक्का बसला आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात उमेदवार काँग्रेसचा असो की राष्ट्रवादी काँग्रेसचा विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव अटळ असल्याचा दावा मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केला.विचारवंत आ. ह. साळुंखे यांच्या अमृतमहोत्सवी गौरव समारंभाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आ. चव्हाण यांनी राजकीय प्रश्नांनाही उत्तरे दिली. ते म्हणाले, राज्यस्तरावर भाजप, शिवसेना आणि एमआयएम वगळून धर्मनिरपेक्षता मान्य असणाऱ्या पक्षांची महाआघाडी होणार आहे. यासाठीची बोलणी पक्षीय नेतृत्व स्तरावर सुरू आहे. शिवसेनेचे खा. चंद्रकांत खैरे आतापर्यंत जातीय, धार्मिक विद्वेष पसरवून निवडणुका लढवत होते. यावेळी कोणत्याही प्रकारचा जातीय विद्वेष चालणार नाही. यामुळे आघाडीच्या बोलणीत औरंगाबादची जागा कोणालाही सुटली तरी त्याठिकाणी पुरोगामी विचारधारा असलेल्या पक्षाचाच उमेदवार विजयी होईल. नुकत्याच झालेल्या कन्हैयाकुमार यांच्या सभेला युवकांची मोठी गर्दी होती. या युवकांना बदल हवा असल्याचे प्रकर्षाने दिसून आले. हा बदल युवकच घडवून आणतील. भाजप, शिवसेना आणि एमआयएम या एकाच नाण्याच्या बाजू असल्याचे तेलंगणा निवडणुकीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत एमआयएमची कोणतीही जादू चालणार नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. बहुजन वंचित आघाडीच्या माध्यमातून प्रयत्न करीत असलेले भारिप- बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे पुरोगामी पक्षांच्या महाआघाडीत स्वागत असल्याचेही त्यांनी सांगितले.काकासाहेब शिंदे यांच्या भावाला नोकरीमराठा आरक्षणासाठी गोदावरी नदीपात्रात आत्महत्या करणाºया काकासाहेब शिंदे यांच्या भावाला शैक्षणिक पात्रतेनुसार कनिष्ठ लिपिकपदावर नोकरी देण्याचा निर्णय मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने घेतला होता. यास नोकरभरतीवर निर्बंध असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘खास बाब’ म्हणून मान्यता दिली असल्याची माहिती आ. चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. काकासाहेब शिंदे यांचा भाऊ अविनाश दत्तात्रय शिंदे यांच्या नोकरीचा प्रश्न मार्गी लागला आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस