शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

केंद्र सरकारविरुद्ध काँग्रेसचे आंदोलन

By admin | Updated: May 27, 2015 00:38 IST

जालना : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने जनतेला खोटी आश्वासने दिल्याचा आरोप करत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी ‘अच्छे दिन’ ची प्रतिकात्मक पुण्यतिथी म्हणून आंदोलन करण्यात आले.

जालना : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने जनतेला खोटी आश्वासने दिल्याचा आरोप करत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी ‘अच्छे दिन’ ची प्रतिकात्मक पुण्यतिथी म्हणून आंदोलन करण्यात आले.याबाबत अप्पर जिल्हाधिकारी बी.एल. गिरी यांना पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले. लोकसभा निवडणुकीत भाजपा नेत्यांनी पेट्रोल, डिझेल, गॅस स्वस्त करणार, जीवनावश्यक वस्तूंची महागाई रोखणार इत्यादी आश्वासने देण्यात आली. मात्र त्याची पूर्तता झाली नाही. अच्छे दिन येणार म्हणून लोकांना भुलविणारी खोटी आश्वासने भाजपा नेत्यांनी दिली. याउलट जनहितविरोधी निर्णय घेण्यास सरकारने सुरूवात केला, असा आरोप करून काँग्रेसच्या वतीने भाजपा सरकारचा निषेध करण्यात आला. जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे, माजी आमदार कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे यांच्या नेतृत्वाखाली गांधीचमन येथे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात शहराध्यक्ष अब्दूल हाफिज, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष बदर चाऊस, सेवादल अध्यक्ष प्रशांत वाढेकर, बाबूराव कुलकर्णी, सुभाष काटकर, वसंत डोंगरे, विष्णू कंटुले, सुरेश तळेकर, इकबाल कुरैशी, सदाशिव गाडे, श्रीकिशन जेठे, राम सावंत, ज्ञानेश्वर डुकरे, मंजितराव टकले, सोनाबाई निकाळजे, अशोक उबाळे, शीतल तनपुरे, नगरसेवक अरूण मगरे, संजय भगत, रवि अकोलकर, महेंद्र अकोलकर, राहुल हिवराळे, रमेश गौरक्षक, विष्णू वाघमारे, शेख माजेद, चंद्रकांत पगारे, जाकेर डावरगावकर, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष संजय खडके, शेख मोबीन यांची उपस्थिती होती.आंदोलनप्रसंगी बोलताना माजी आमदार गोरंट्याल म्हणाले की, जनहित विरोधी असणाऱ्या व खोटी स्वप्ने दाखवून मते मागणाऱ्या भाजपा सरकारचे खरे रूप लोकांसमोर आले आहे. हे सरकार मोठे उद्योगपती, भांडवलदार व बिल्डर यांच्या फायद्यासाठी काम करत असून शेतकरी व गोरगरीब जनता यांचा सरकारला विसर पडला आहे. त्यामुळे सरकारला जागे करण्यासाठी गोरगरीब जनतेच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.यावेळी विनोद यादव, शेख ईसा, रमाकांत मद्दलवार, अरूण सरदार, शेख अफरोज, मोसीन पठाण, ज्ञानेश्वर उगले, अंजेभाऊ चव्हाण, माणिक राठोड, लता डोंगरे, कादर मोमीन, एस.एन. देशमुख, शेख नसीर, राज स्वामी, राजू वीर, देवीलाल डोंगरे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)