शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांवर का संतापले काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 23:34 IST

जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी काँग्रेसच्या मोर्चाचे नेतृत्व करणारे आ.अब्दुल सत्तार व शिष्टमंडळाला ताटकळत ठेवल्यामुळे त्यांचा संताप अनावर झाला. विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना भेटू नये, असा सरकारचा प्रशासनाला आदेश आहे की काय? असा संतप्त सवालही सत्तार यांनी माध्यमांशी बोलताना केला.

ठळक मुद्देकाँग्रेस: विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींचा अवमान केल्याचा आरोप

औरंगाबाद : जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी काँग्रेसच्या मोर्चाचे नेतृत्व करणारे आ.अब्दुल सत्तार व शिष्टमंडळाला ताटकळत ठेवल्यामुळे त्यांचा संताप अनावर झाला. विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना भेटू नये, असा सरकारचा प्रशासनाला आदेश आहे की काय? असा संतप्त सवालही सत्तार यांनी माध्यमांशी बोलताना केला.निरपराधांवर होणाºया पोलीस अत्याचारांविरोधात काँग्रेसने सोमवारी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्या मोर्चाचे निवेदन देण्यासाठी आ. सत्तार यांच्यासह आ. सुभाष झांबड, माजी आ. डॉ. कल्याण काळे, नामदेव पवार, नितीन पाटील आदी पदाधिकारी जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यासाठी दुपारच्या सुमारास जिल्हाधिकाºयांना भेटण्यासाठी गेले होते. एका बैठकीत असल्याचे सांगून जिल्हाधिकाºयांनी त्या शिष्टमंडळाला ताटकळत ठेवले. जिल्हाधिकाºयांनी तातडीने निवेदन स्वीकारावे, अशी भूमिका काँग्रेस पदाधिकाºयांनी घेतली. लोकप्रतिनिधींना भेटण्यासाठी जिल्हाधिकारी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप सत्तार यांनी करण्यास सुरुवात करताच जिल्हाधिकारी चौधरी आले, मात्र शिष्टमंडळात कॅमेरामन व इतर माध्यम प्रतिनिधींना पाहून ते भडकले निवेदन देतानाचे छायाचित्र काढण्यास जिल्हाधिकाºयांनी विरोध केल्याचा आरोप सत्तार यांनी केला.जिल्हाधिकाºयांनी आम्हाला ताटकळत ठेवले भेट दिली नाही. लोकप्रतिनिधींना योग्य मान सन्मान देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घ्या, असा सरकारचा अध्यादेश आहे. जिल्हाधिकाºयांना त्याचा विसर पडला की काय,असा सवाल सत्तार व पदाधिकाºयांनी केला.जिल्हाधिकारी म्हणालेजिल्हाधिकारी चौधरी यांनी सांगितले, असे काही घडले नाही. मी शेजारच्या दालनात बैठकीत होतो. कुणाचाही अपमान केला नाही. लोकप्रतिनिधी येणार असल्याची पूर्वसूचना मिळाली नव्हती. ते येणार असल्याची माहिती मिळताच त्यांना दालनात बसण्याचा निरोप दिला होता. दरम्यान काही क्षणातच दालनाबाहेर गदारोळ सुरू झाल्याचे कानावर आले.तीन वर्षांपूर्वी असेच घडले होतेतीन वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी वीरेंद्रसिंग यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे निवेदन बसून स्वीकारले होते. लोकप्रतिनिधींचा अवमान झाल्याचा आरोप त्यावेळी काँगे्रसच्या गोटातून करण्यात आला होता. त्या घटनेनंतर आठवड्यातच जिल्हाधिकाºयांची बदली झाली होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliticsराजकारण