शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
2
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
3
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
4
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
5
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
6
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
7
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
8
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
9
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
10
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
11
मायेची सावली! भावासाठी बहीण झाली ढाल; किडनी डोनेट करुन दिलं जीवदान, रक्षाबंधन झालं खास
12
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
13
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
14
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
15
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
16
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
17
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
18
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
19
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
20
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप

महापालिका रणधुमाळीत काँग्रेसची आघाडी

By admin | Updated: July 13, 2017 00:27 IST

नांदेड: आरक्षण सोडत आणि प्रभाग रचनेच्या निश्चितीनंतर महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला प्रारंभ झाला असून या रणधुमाळीत महापालिका निवडणुकीच्या रणनीतीत काँग्रेसने आघाडी घेतली आहे़

अनुराग पोवळे । लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: आरक्षण सोडत आणि प्रभाग रचनेच्या निश्चितीनंतर महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला प्रारंभ झाला असून या रणधुमाळीत महापालिका निवडणुकीच्या रणनीतीत काँग्रेसने आघाडी घेतली आहे़ १४ जुलैपासून काँग्रेसने इच्छुकांचे अर्ज मागवले आहेत़ महापालिका निवडणुकीसाठी १० जुलै रोजी आरक्षण फेरसोडत झाल्यानंतर संपूर्ण २० प्रभागांचे चित्र स्पष्ट झाले़ त्यामुळे इच्छुकही मोठ्या संख्येने पुढे आले आहेत़ काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या नांदेड महापालिकेवर भगवा फडकविण्याचे तसेच नांदेडात कमळ फुलविण्याची तयारी करीत राज्यात सत्ताधारी असलेल्या युतीतील सेना- भाजपाने स्वतंत्रपणे रणनीती आखण्यास प्रारंभ केला आहे़ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़ अशोकराव चव्हाण यांच्या टीमनेही महापालिकेवरील आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी संपूर्ण रणनीती आखली आहे़ खा़ चव्हाण यांनी महापालिका निवडणुकांची जबाबदारी ही काँग्रेस महानगराध्यक्ष आ़ अमरनाथ राजूरकर आणि माजी राज्यमंत्री आ़ डी़ पी़ सावंत यांच्यावर दोन महिन्यांपूर्वीच सोपवली होती़ १४ जुलैपासून काँग्रेसने २० प्रभागांमध्ये इच्छुक असलेल्या उमेदवारांचे अर्ज मागितले आहेत़ २४ जुलैपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार असून जातपडताळणी प्रमाणपत्रांसह अर्ज सादर करावे लागणार आहेत़ दुसरीकडे भाजपाच्याही महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बैठका सुरू आहेत़ भाजपाने नांदेड महापालिका निवडणूक प्रभारी म्हणून लातूरमध्ये कमळ फुलवणाऱ्या कामगारमंत्री संभाजी निलंगेकर यांच्यासह सुजितसिंह ठाकूर यांची नियुक्ती केली आहे़ त्यामुळे या निवडणुकीत स्थानिकांचे किती महत्व अबाधित राहील हे आगामी काळातच स्पष्ट होणार आहे़ भाजपाचे निवडणूक प्रभारी कामगारमंत्री निलंगेकर हे २२ जुलै रोजी नांदेडमध्ये येणार असल्याचे सांगण्यात येत आहे़ त्यांच्या नांदेड दौऱ्यानंतरच भाजपाचे निवडणुकीबाबतचे व्हिजन स्पष्ट होणार आहे़ राज्यातील सत्ता आणि लातूरमध्ये अलीकडेच जिंकलेल्या महापालिका निवडणुका यामुळे भाजपाचा उत्साह वाढला आहे़ शिवसेनेचीही एक प्राथमिक बैठक सेनेच्या दोन आमदारांच्या उपस्थितीत पार पडली़ विधानपरिषद निवडणुकीनंतर पहिल्यांदाच या दोन आमदारांची विस्तृत चर्चा झाल्याने शिवसैनिकांनी समाधान व्यक्त केले होते़ सेनेच्या या बैठकीत विद्यमान नगरसेवकांनी आमच्या आहे त्या जागा सोडून युतीवर चर्चा करावी, असा प्रस्ताव नेत्यांसमोर ठेवला़ शिवसेनाही भाजपाशी युती करण्याबाबत सकारात्मक असल्याचे आ़ हेमंत पाटील यांनी सांगितले होते़ दुसरीकडे युतीबाबत भाजपाकडून कोणतीही भूमिका अद्याप स्पष्ट करण्यात आली नाही़ महापालिकेत सत्तेत भागीदार राष्ट्रवादी काँग्रेसकडून मात्र अद्याप कोणत्याही हालचाली सुरू झाल्या नाहीत़ महिनाभरापूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आदींच्या उपस्थितीत नांदेडमध्ये पक्ष संघटन वाढविण्यासंदर्भात बैठक घेतली़ राष्ट्रवादीच्या नांदेड शहरातील स्थितीबाबत खुद्द अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून आगामी काळात तरी पक्ष वाढवा, असा सल्ला दिला होता़ मात्र अद्याप कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत़