शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसने काढला ‘विधानसभे’चा वचपा

By admin | Updated: April 7, 2016 00:25 IST

गोविंद इंगळे , निलंगा निलंगा विधानसभा व औराद बाजार समितीच्या निवडणूकीत दोन वेळा झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी काँग्रेसचे अशोकराव पाटील निलंगेकर

गोविंद इंगळे , निलंगानिलंगा विधानसभा व औराद बाजार समितीच्या निवडणूकीत दोन वेळा झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी काँग्रेसचे अशोकराव पाटील निलंगेकर यांनी पुतण्या आ़संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या विरोधात शिस्तबध्द नियोजन केले़ त्यामुळेच निलंगा कृषी उत्पन्न बाजार समितीवर दणदणीत विजय मिळवून त्यांनी दोन वेळा झालेल्या पराभवाचा वचपा काढत बाजार समितीवर काँग्रेसचा झेंडा फडकावला़विधानसभा निवडणुकीत पराभव पत्कारलेल्या अशोकरावांना औराद कृषी उत्पन्न बाजारसमितीवर वर्चस्व निर्माण करता आले नाही़ सलग दोनवेळा अपयश आल्याने काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मरगळ आली होती़ म्हणून केवळ कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव अशोकरावांनी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला़ दरम्यान विरोधकांची टिकेची झोड सुरु झाली़ विधानसभा, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा परिषद असा प्रवास करीत अशोकरावांनी कृषी उत्पन्न बाजार समितीवर निवडणूक लढवून सामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय केला़ तर केवळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ८ एकर जमिनीवर डोळा ठेवून निवडणूक लढवित असल्याचा आरोप पुतण्या आ़संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केला़ खुद्द अशोकराव पाटील निलंगेकर हे निवडणूकीच्या रिंगणात असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह होता़ विरोधकांच्या टिकेला न जुमानता अशोकरावांनी विजयी घोडदौड सुरु केली़ आ़बसवराज पाटील मुरुमकर हेही विधानसभेत केलेल्या मदतीची उत्तराई करत अशोकरावांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीले़ व निलंगा तालुक्यातील ६४ गावांतील मतदारांची उमरगा येथे बैठक घेऊन विजयाचा विडा उचलूनच बाहेर पडले़ माजी मुख्यमंत्री डॉ़शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी निलंगा बैठकीत आवाहन केले होते़ तरीही विधानसभा व औराद बाजारसमितीच्या निवडणूकीत झालेल्या चुकीची दुरुस्ती करत अशोकरावांनी व्युव्हरचना करीत मोर्चेबांधणी केली़ गृहभेटी, प्रत्यक्ष कॉर्नर बैठका आवश्यक ठिकाणी सभा लाऊन स्वत: लक्ष देऊन विजयश्री खेचून आणला़ या विजयामुळे काँगे्रस कार्यकर्त्यांत आता नवचैतन्य आले असून भविष्यातील अपेक्षा निश्चितच वाढल्या आहेत़ शिवसेनेचे लिंबन महाराज रेशमे व अविनाश रेशमे यांनी उमदेवार उभे केले़ मात्र, अभय साळुंके, शिवाजी माने, ईश्वर पाटील, शेषेराव ममाळे यांना विश्वासात न घेतल्याने पराभवाला सामोरे जावे लागले़