शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

काँग्रेसला आत्मविश्वास नडला !

By admin | Updated: August 12, 2015 00:59 IST

बालाजी थेटे , औराद शहाजानी औराद बाजार समितीची निवडणूक पहिल्यांदाच झाली असून, ३७ विविध कार्यकारी सोसायटीपैकी २२ सोसायट्यांवर काँग्रेसची सत्ता आहे़

बालाजी थेटे , औराद शहाजानीऔराद बाजार समितीची निवडणूक पहिल्यांदाच झाली असून, ३७ विविध कार्यकारी सोसायटीपैकी २२ सोसायट्यांवर काँग्रेसची सत्ता आहे़ मात्र भाजपाने अतिशय नियोजनबद्ध प्रचार करुन १४ पैकी ९ जागांवर विजय मिळविला आहे़ काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना आत्मविश्वास नडल्यामुळेच भाजपाने औराद बाजार समितीची निवडणुकीत वर्चस्व निर्माण केल्याचे बोलले जात आहे़ औराद बाजार समितीवर अनेकदा प्रशासक आलेले आहे़ मतदारांतून पहिल्यांदाच संचालक मंडळ आले आहे़ औराद बाजार पेठेत महाराष्ट्रासह शेजारील कर्नाटक राज्यातून शेतीमाल येतो़ बाजार पेठेची उलाढालही मोठी आहे़ ५८ गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या या बाजार समितीवर आपली सत्ता यावी म्हणून, भाजपा, काँग्रेस व शिवसेना या पक्षांनी निवडणूक प्रचाराची आखणी केली होती़ भाजपाचे आ़ संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे बंधू अरविंद पाटील यांनी औराद शेतकरी विकास पॅनलची धुरा सांभाळून औरादमध्येच ठाण मांडले होते़ अतिशय नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा हाताळून त्यांनी थेट मतदारांशी संवाद साधला़ आ़ संभाजी पाटील व माजी आ़ पाशा पटेल यांनीही औराद, अंबुलगा येथे मोठ्या सभा, बैठका घेऊन मतदारांना विकासासाठी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केले़ तर काँग्रेस पक्षाचे जि़प़चे माजी अध्यक्ष अशोकराव पाटील निलंगेकर यांनी डॉ़ शिवाजीराव पाटील निलंगेकर शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून प्रचार यंत्रणा राबविली़ काँग्रेसचे आ़ बस्वराज पाटील यांनीही औसा मतदार संघात प्रचार सभा घेतल्या़ शिवसेनेच्या वतीने लिंबन महाराज रेशमे, संपर्क प्रमुख संजय सावंत, जिल्हाध्यक्ष संतोष सोमवंशी, अभय साळुंके, पप्पू कुलकर्णी यांच्या उपस्थितीत प्रचार रॅली काढली़ औराद येथे मेळावाही घेतला़ पण फारसा प्रभाव शिवसेनेला दाखवता आला नाही़ एवढेच काय त्यांना व्यापारी मतदारसंघातून उमेदवारही भेटला नाही़ एकंदरीत सत्ता संघर्षाच्या या निवडणुकीत भाजपानेच आपले उमेदवार प्रथम क्रमांकाने निवडून आणले आहेत़ व्यापारी मतदार संघातून भाजपाचे दोन्हीही उमेदवार निवडून आले असून, अत्यंत कमी मताने काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले आहेत़ या मतदार संघावर काँग्रेसचे वर्चस्व आहे, असे म्हणत मतदारांनी भाजपाच्या पारड्यात मत दिले़ दिग्गजांचा निकाल अद्याप लागलेला नाही़ यात काँग्रेसचे मोहन भंडारे, समयोद्दीन देशमुख, भाजपाचे अजित माने, बस्वराज वलांडे या चौघांचे भवितव्य मतपेटीत बंद आहे़ न्यायालयाच्या निकालानंतर या मतदार संघाची मतमोजणी होणार आहे़