शहरं
Join us  
Trending Stories
1
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
2
पुतिन यांनीच फोडला 'बॉम्ब'! तेल खरेदी करण्यावरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
3
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
4
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
5
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
6
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
7
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
8
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
9
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
10
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
11
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
12
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
13
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
14
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
15
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
17
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
18
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
19
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
20
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक

उदगीरसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी

By admin | Updated: June 11, 2014 00:27 IST

चेतन धनुरे , लातूर लोकसभेच्या रणधुमाळीपूर्वीच उदगीर विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची मार्चेबांधणी सुरु झाली आहे़

चेतन धनुरे , लातूरलोकसभेच्या रणधुमाळीपूर्वीच उदगीर विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची मार्चेबांधणी सुरु झाली आहे़ अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात तुल्यबळ उमेदवारांची कमी नाही़ त्यामुळे कधी कोणाचा नंबर लागेल याचा नेम नाही़ दहा वर्षांपासून हा मतदारसंघ आघाडीत राकाँच्या वाट्याला आला आहे़ परंतु, यावेळी चित्र पालटले असून, काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थेत आपले बळ दाखवून हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत़ तर दुसरीकडे भाजपात दोन गट पडले असून, एक गट विद्यमान आमदारांना डावलण्याच्या प्रयत्नात आहे़उदगीर मतदारसंघाने सातत्याने कूस बदलली आहे़ मागील चार निवडणुकांवर नजर टाकली असता काँग्रेस, भाजपा, राकाँ अन् आता पुन्हा भाजपा असा मतदारांनी कौल दिला आहे़ त्यामुळे यावेळची लढतही रंगतदार होईल. मागील निवडणुकीत राकाँचे उमेदवार मच्छिंद्र कामत यांना १७,२७७ मतांनी नमवून भाजपाचे डॉ़सुधाकर भालेराव विजयी झाले होते़ परंतु, दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे़ राष्ट्रवादीचा ‘हुकूमी’ एक्का असलेल्या माजी आमदार चंद्रशेखर भोसले यांनी काँग्रेसचा ‘हात’ हातात घेतला आहे़ त्यामुळे राष्ट्रवादीचे बळ या मतदारसंघात काहीअंशी घटले आहे़ नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थेत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळविली आहे़ यावेळी हा मतदारसंघ पुन्हा आपल्याकडे आणण्यासाठी काँग्रेसची मंडळी जोरदार प्रयत्न करीत आहे़ विधानसभेला आघाडी झालीच तर एका छुप्या ‘तहा’नुसार अहमदपूरची जागा राष्ट्रवादीला सोडून उदगीर पदरात पाडून घेण्यासाठी काँग्रेसमधून हालचाली सुरु आहेत़ राकाँही उदगीरची ‘पडेल’ जागा सोडून विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील यांच्यासाठी अहमदपूर पदरात पाडून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही़ आघाडीत जर हा मतदारसंघ काँग्रेसला सुटला तर प्रा़रामकिशन सोनकांबळे, माजी नगराध्यक्षा उषा कांबळे यांची नावे उमेदवारीसाठी प्रामुख्याने पुढे असतील़ राष्ट्रवादीकडून गतवेळचे उमेदवार मच्छिंद्र कामत यांचे नाव पुन्हा चर्चेत येत आहे़ राकाँचे प्रदेश सरचिटणीस संजय बनसोडे यांनी सातत्याने कार्यकर्त्यांशी संपर्क ठेऊन या जागेवर आपला दावा ठोकला आहे़ तर याच भागातील माजी सभापती मधुकर एकुर्केकर यांचाही राकाँकडून दावा सुरु आहे़दरम्यान, पदाधिकारी निवडीवरुन लोकसभेपूर्वीच भाजपातील सुंदोपसुंदी उघड झाली़ मुंडे समर्थक गटातील माजी आमदार गोविंद केंद्रे यांनी विद्यमान आमदार डॉ़सुधाकर भालेराव यांना विरोध केला होता़ लोकसभा निवडणुकीपूर्वी या दोहोंनीही ‘आमच्यातील वाद संपला’, असे जाहीर करुन गळ्यात गळे घातले असले तरी, अंतर्गत खदखद अजूनही संपली नाही़ पडद्याआडून भालेरावांच्या नावाला विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ मतदारांच्या सतत संपर्कात असलेले भालेराव आपला दावा मागे घेण्याची स्थिती नाही़ दुसरीकडे भाजपाचे खासदार डॉ़सुनील गायकवाड यांचे पुतणे विश्वजीत गायकवाड यांच्यासाठीही मोर्चेबांधणी सुरु आहे़ लोकसभेसाठी प्रयत्न केलेल्या डॉ़अनिल कांबळे शेल्हाळकर हेही भाजपाकडून इच्छुक आहेत़ तर उद्योजक मदन गायकवाड यांनी सामाजिक कार्याच्या माध्यमातून आपली स्वतंत्र मोर्चेबांधणी उदगीरसाठी सुरु केली आहे़२००९ : प्रमुख २ उमेदवारांची मते...भाजपसुधाकर भालेराव७३,८४०राकाँमच्छिंद्र कामत५६,५६३इच्छुकांचे नाव पक्षसुधाकर भालेराव, अनिल कांबळे भाजपा संजय बनसोडे, मच्छिंद्र कामत राकाँरामकिशन सोनकांबळे, उषा कांबळे काँग्रेस मदन गायकवाड (स्वतंत्र)