शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

काँग्रेसच लातूरचा विकास करू शकते

By admin | Updated: October 12, 2014 00:45 IST

लातूर : विलासराव देशमुख आणि माझे वडील माधवराव शिंदे हे लोकनायक नेते होते. माझे भाऊ अमित देशमुखच विलासरावांनी केला तसा लातूरचा विकास करु शकतात.

लातूर : विलासराव देशमुख आणि माझे वडील माधवराव शिंदे हे लोकनायक नेते होते. माझे भाऊ अमित देशमुखच विलासरावांनी केला तसा लातूरचा विकास करु शकतात. मंत्रीपदाच्या शंभर दिवसात दीड हजार कोटीची विकासकामे खेचून आणणाऱ्या अमित देशमुखांच्या पाठीमागे लातूरकरांनी खंबीरपणे उभे राहून त्यांना निवडून द्यावे, असे आवाहन काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी शनिवारी दुपारी हनुमान चौकात झालेल्या सभेत केले. यावेळी मंचावर माजी राज्यमंत्री अमित देशमुख, माजी मंत्री आ. दिलीपराव देशमुख, आ. बसवराज पाटील, महापौर स्मिता खानापुरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अलि अजिजी, आ. वैजनाथ शिंदे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष एस. आर. देशमुख, प्रा. बी. व्ही. मोतीपवळे, धीरज देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. व्यंकट बेद्रे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. लातूरकरांचे शनिवारी ज्योतिरादित्य हे खास आकर्षण ठरले. भरगच्च लातुरकरांच्या उपस्थितीत त्यांनी लातुरकरांना जिंकून घेतले. अमित देशमुख आणि ज्योतिरादित्य शिंदे ही जोडगोळी मंचावर येताच टाळ्यांच्या कडकडाटाने त्यांचे जंगी स्वागत झाले. आपल्या अस्खलित मराठीतून बोलताना ज्योतिरादित्य शिंदे यांनी लातूरकरांना जिंकले. पुढे बोलताना अमित देशमुखांच्या नेतृत्वाचे कौतुकही केले. लातूरचा हा सुपूत्र आपल्या वडीलांप्रमाणेच राज्यात नाव करणार असल्याचे सांगून शंभर दिवसाच्या मंत्रीपदाच्या काळात दीड हजार कोटीची विकास कामे हा विक्रम केला आहे. विलासराव देशमुखांसारखे लोकनेते या लातूरने देशाला दिले होते. माझ्या वडीलांशी विलासरावांचे खुप चांगले संबंध होते. ते दोघे जवळचे मित्र होते. त्यांच्या सारखा विकासपुरुष होणे नाही. जसे लातूरकर विलासरावांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहीले, तसेच अमित देशमुखांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार यात शंका नाही. कारण विलासरावांचा वारसा अमित देशमुख मोठ्या खुबीने चालवित आहेत. देशमुख परिवाराने लातूरच्या विकासासाठी स्वत:ला वाहून घेतले आहे. भाजपा हा जातीयवादाचे विष पेरणारा पक्ष आहे. सत्तेत आल्यावर लोक कसे बदलतात याचे उदाहरण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे. चीन, पाकिस्तानला धडा शिकवू म्हणणारे मोदी चीनच्या राष्ट्रपतींबरोबर झुल्यावर बसून वार्तालाप करीत होते. तेव्हा चीन देशावर कुरघोड्या करीत होता. कुठे गेली ती मोदींची प्रचारातील भाषा ? असा सवालही त्यांनी केला. आपल्या ओघवत्या भाषणात ज्योतिरादित्य यांनी लातूरकरांना जिंकून घेतले. यावेळी अली अजिजी म्हणाले, काँग्रेसने सर्व समाजाच्या विकासासाठी भरभरून प्रयत्न केले आहेत. अजूनही पक्षाचे धोरण सर्वसामान्यांचा विकास हेच आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाला मतदान करावे, असे त्यांनी सांगितले.प्रारंभी व्यंकट बेद्रे यांनी प्रास्ताविक केले तर काँग्रेस शहराध्यक्ष मोईज शेख यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)