परभणी: केंद्र शासनाने केलेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढीचा काँग्रेस कार्यकर्त्यांनी रविवारी दुचाकी ढकलून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला. काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी अच्छे दिन आयेंगे असे सांगत सर्वसामान्यांना आश्वासने दिली होती. मात्र सत्ता येताच त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे बुरे दिन आए असे म्हणण्याची वेळ आली, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. पेट्रोल, डिझेल, गॅस, रेल्वे वाहतुकीचे दर वाढविण्यात आल्याने सर्वसामान्य जनता महागाईच्या आगीत होरपळत आहे.पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा निषेध नोंदविण्यासाठी येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी रविवारी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. शनिवार बाजारातील राजीव भवन येथून शिवाजी चौकापर्यंत दुचाकी गाड्या ढकलत नेऊन आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख, शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, प्रदेश सचिव इरफान ऊर रहेमानखान, भगवानराव वाघमारे, बाळासाहेब फुलारी, बंडू पाचलिंग, राजेश देशमुख, शिवाजी भरोसे, रवींद्र पतंगे, प्रवीण देशमुख, बाळासाहेब रेंगे, विनय बांठिया, इम्रान झैन, नागेश सोनपसारे, गणेश देशमुख, माजीद जहागिरदार, खदीर लाला, पप्पू मोरे, सुनील देशमुख, वसंत शिंदे, सत्तार पटेल, अभय देशमुख, प्रतापराव पवार, सुनील साळवे, कुणाल निकम, बाळासाहेब राऊत, सचिन मुंढे, परवेझ खुसरो, राजेश पाटील, सिद्धार्थ लोणकर, राजेश रेंगे आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
काँग्रेसतर्फे दुचाकी ढकलून निषेध
By admin | Updated: July 7, 2014 00:19 IST