शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

पुन्हा काँग्रेस, शिवसेनेत टस्सल !

By admin | Updated: June 14, 2014 01:20 IST

रमेश शिंदे, औसा काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या औसा विधानसभा मतदारसंघावर १९९९ आणि २००४ मध्ये शिवसेनेने भगवा फडकाविला होता.

रमेश शिंदे, औसाकाँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या औसा विधानसभा मतदारसंघावर १९९९ आणि २००४ मध्ये शिवसेनेने भगवा फडकाविला होता. तर २००९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार दिनकर माने यांच्यावर १४ हजार ९७५ मतांनी काँग्रेस उमेदवार बसवराज पाटील यांनी मात केली. आता होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही काँग्रेस, शिवसेनेतच लढत होण्याची शक्यता असून, मनसेकडूनही तयारी सुरू आहे. राष्ट्रवादीच्या भूमिकेला महत्त्व येणार आहे.लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर विधानसभा निवडणुकीचे वेध सर्वच राजकीय पक्षांतील इच्छुकांना लागले आहेत. त्यानुसार मोर्चेबांधणीही सुरू झाली आहे. औसा तालुक्यातील १०३ आणि निलंग्यातील ६३ गावे मिळून हा मतदारसंघ आहे. आपसूकच औशाचा आमदार ठरविताना निलंगा तालुक्यालाही महत्त्व आले आहे.गेल्या ५ वर्षांत मोठ्या प्रमाणात निधी खेचून औसा विधानसभा मतदारसंघाला विकासाच्या रुळावर आणल्याचा दावा काँग्रेस करीत आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीतही पुन्हा काँग्रेस विजयी होईल, अशी खात्री त्यांना आहे. त्यामुळेच विद्यमान आमदार बसवराज पाटील उमेदवारीचे दावेदार आहेत. तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत औसा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार रवि गायकवाड यांना ५४ हजारांची आघाडी मिळाली आहे. विधानसभेतही अशीच आघाडी मिळेल, अशी खात्री शिवसेनेला आहे. तथापि, शिवसेनेकडून माजी आमदार दिनकर माने यांचा प्रबळ दावा आहे. तर दिनकर माने यांचे समर्थक आणि मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे संचालक बालाजी गिरे मनसेचा झेंडा खांद्यावर घेऊन विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. असे अनेक इच्छुक कामाला लागले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीसाठी साई शुगरचे चेअरमन राजेश्वरराव बुके यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली होती. आताही त्यांनी मतदारसंघात चाचपणी सुरू केली असून, ते काँग्रेसकडून लढण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत भरघोस मतांची आघाडी मिळाल्यामुळे शिवसेनेत चैतन्य असून, विधानसभा निवडणुकीतही त्यांना चमत्काराची अपेक्षा आहे. तर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या काही लोकांनी डॉ. पद्मसिंह पाटील यांना मदत केली नसल्याचा आरोप करणाऱ्या राष्ट्रवादीच्या भूमिकेला महत्त्व येणार आहे. एकूणच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, शिवसेनेत लढत होण्याची शक्यता असून, मनसेही या निवडणुकीत रंगत आणणार आहे. काँग्रेसबसवराज पाटील मुरुमकर८४५२६शिवसेनादिनकर माने६९७७१अपक्षअ‍ॅड. श्रीकांत सूर्यवंशी ३३०८इच्छुकांचे नाव पक्षबसवराज पाटील मुरुमकर काँग्रेसराजेश्वरराव बुके काँग्रेसदिनकर माने शिवसेनाबालाजी गिरे मनसे लोकसभा निवडणुकीत रवि गायकवाड यांना ५४ हजार मताधिक्य