शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

६० वर्षांपासून काँग्रेस एकच नारा देत आहे, तरीही त्यांच्याकडून गरिबी हटत नाही: मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 16:03 IST

काँग्रेसच्या गरिबी हटाव या नाऱ्याचा खरपूस समाचार

औरंगाबाद : काँग्रेसच्या जाहीरनाम्यात गरिबांना ७२ हजार रुपये देण्याच्या आणि कलम १२४ (अ)१ रद्द करण्याच्या घोषणेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली. सोमवारी गजानन महाराज मंदिर चौकातील जाहीर सभेत काँग्रेसच्या गरिबी हटाव या नाऱ्याचा खरपूस समाचार घेत त्यांनी पंजोबा, आजी, आई आणि नातू (काँग्रेस अध्यक्ष खा.राहुल गांधी) हे एकच घोषणा वारंवार करीत आहेत. ६० वर्षांपासून ते व काँग्रेस एकच नारा देत आहेत, तरीही त्यांच्याकडून गरिबी हटत नसल्याचा आरोप त्यांनी केला. 

शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खा.चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा झाली. उमेदवार खैरे यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन, आ.अतुल सावे, आ.संजय शिरसाट, आ.प्रशांत बंब, महापौर नंदकुमार घोडेले, जि. प. अध्यक्ष देवयानी डोणगावकर आदींची यावेळी उपस्थिती होती. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी म्हणाले होते केंद्रातून १ रुपया जर खाली सोडला तर ८५ पैसे दलाल खातात. मोदींनी ही सगळी खाबूगिरी बंद केली आहे. ते गरिबी हटविण्यासाठी काम करीत आहेत. मोदींनी काळा पैसा आणायचा आणि तो काँगे्रसने ७२ हजार रुपये देऊन वाटायचा, असे ‘आयजीच्या जिवावर बायजी उधार’काँग्रेसचे धोरण असल्याचा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी ‘खुद खाऊंगा ना दुसरों को खाने दुंगा’ याप्रमाणे काम करीत ३४ कोटी गरिबांना जन-धन योजनेत बँकखाते दिले. खात्यावर ८० हजार कोटी रुपये दिल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला. यावेळी शाहनवाज, आ. सावे, आ.  शिरसाट यांची भाषणे झाली.

मुख्यमंत्र्यांचे आश्वासनस्मार्ट सिटीचा दर्जा या शहराला दिला. १२५ कोटी यापूर्वी शहरातील रस्त्यासाठी दिले आहेत. आजवर एवढा निधी कधी तरी औरंगाबाद शहराला मिळाला काय, येथील रस्ते जोपर्यंत पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत निधी देत राहू. पिण्याच्या पाणीपुरवठा योजनेसाठी जेवढा लागेल तेवढा निधी केंद्र आणि राज्य शासनाकडून देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी सभेत दिले. जालना-औरंगाबाद इंडस्ट्रियल हब होणार असल्याचे ते म्हणाले.

‘तो’ अपक्ष अफवा पसरवतोयउमेदवार खा.खैरे यांनी अपक्ष उमेदवार (हर्षवर्धन जाधव यांचे नाव न घेता) आणि एमआयएमचे उमेदवार आ.इम्तियाज जलील यांच्यावर आरोप केले. मला निवडून द्या, मी भाजपला पाठिंबा देईल असे म्हणून एक अपक्ष उमेदवार अफवा पसरवतोय. तो त्याच्या घरच्यांचा नाही, इतरांचा काय होणार. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी लोकसभेत मुद्दा उपस्थित केल्याचे सांगून ते म्हणाले, समांतर जलवाहिनीचे काम लटकले; परंतु येत्या एक वर्षात ते काम पूर्ण करू. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019