शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
3
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
4
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
5
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
6
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
7
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
8
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
9
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
10
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
11
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
12
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
13
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
14
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
15
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
16
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
17
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
18
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
19
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
20
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...

स्थानकात गोंधळ

By admin | Updated: April 27, 2015 00:58 IST

उस्मानाबाद : येथील बसस्थानकात दारूच्या नशेत तर्र असलेल्या एका बसचालकाने रविवारी दुपारी मोठा गोंधळ घातला़ स्थानक प्रमुखांसह इतर अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांशी

उस्मानाबाद : येथील बसस्थानकात दारूच्या नशेत तर्र असलेल्या एका बसचालकाने रविवारी दुपारी मोठा गोंधळ घातला़ स्थानक प्रमुखांसह इतर अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांशी अरेरावी करीत टेबलावरील काचा फोडण्यासह पोलीस कर्मचाऱ्यांशीही अरेरावी केली़ या प्रकरणी स्थानकप्रमुखांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद आगारातील चालक शिवाजी कुंडलीक तेरकर यांची सायंकाळी सहा वाजता भिवंडी बसवर होती़ मात्र, दुपारी एक वाजल्यापासूनच तेरकर यांनी मद्यप्राषण करून वाहक- चालकांना शिवीगाळ करण्यासह अधिकाऱ्यांनाही अरेरावी करीत होता़ दुपारी २ वाजण्याच्या सुमारास स्थानकप्रमुख हर्षद बनसोडे हे कार्यालयाबाहेर आले असता सुपरवायजर टेकाळे, कोळी यांच्याशी तेरकर हे शाब्दीक बाचाबाची करीत असल्याचे दिसून आले़ त्यावेळी बनसोडे यांनी चालक तेरकरची समजूत काढून त्याला तेथून जाण्यास सांगितले़ मात्र, तेरकर यांनी गोंधळ सुरूच ठेवला होता़ त्यावेळी बनसोडे यांनी बसस्थानकात कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला बोलावून चालकाला बाहेर नेण्याबाबत सांगितले़ त्यावेळी तेरकर यांना उठविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यालाही अरेरावी केली़ त्यानंतर स्थानकप्रमुख हर्षद बनसोडे यांच्या कार्यालयातील टेबल उचलून आदळला़ तसेच टेबलावरील काचा फोडून, कागदपत्रे, फाईल्स विस्कटून टाकल्या़ स्थानकात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने शहर पोलिसांना माहिती देवून कर्मचारी बोलावून घेतले़ त्यावेळी आलेल्या कर्मचाऱ्यांनाही तेरकर अरेरावी करीत असल्याचे स्थानकप्रमुख बनसोडे यांनी सांगितले़ त्यानंतर तेरकर याला शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे़ या प्रकरणी पोलीस कर्मचारी बिभिषण देडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बसचालकाविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास फौजदार जमादार हे करीत आहेत़ (प्रतिनिधी)