परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या समोर टेम्पो व आॅटोच्या झालेल्या किरकोळ अपघातानंतर चांगलाच गोंधळ उडाला. उपस्थित नागरिकांनी काही वाहनधारकांना मारहाण केल्याने वसमतरोडवरील वाहतूक प्रभावित झाली होती. शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ गेटसमोर सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास वसमतकडे जाणाऱ्या एम.एच.२२-एए १०८ क्रमांकाच्या टेम्पोचा व एम.एच.२२- यू ४३७९ या क्रमांकाच्या आॅटोचा अपघात झाला. या अपघातात एक महिला जखमी झाली. या किरकोळ अपघातानंतर जमाव जमला व काहींनी येणाऱ्या वाहनधारकांनाच मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे वाहतुकही प्रभावित झाली. घटनास्थळी तातडीने पोलिस दाखल झाले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता.(प्रतिनिधी)
किरकोळ अपघातानंतर उडाला गोंधळ
By admin | Updated: August 20, 2014 00:21 IST