शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

व्हायरल आणि कोरोनाचा फरकच कळत नसल्याने नागरिकांची घाबरगुंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 12:45 IST

ढगाळ हवामान आणि थंडीमध्ये झालेली वाढ या वातावरणातील बदलाने विषाणूसंसर्गाचा अनेकांना त्रास होत आहे.

ठळक मुद्देतीन दिवसांपेक्षा अधिक काळ लक्षणे दिसल्यास करा कोविड तपासणीथंडी वाढल्याने सर्दी, खोकला, किंचितसा ताप, असे आजार डोके वर काढतात

औरंगाबाद : दिवाळीमध्ये निवांत झालेले अनेक जण पुन्हा कोरोनाची दुसरी लाट येणार, या वार्तेने धास्तावलेले आहेत. अशातच थंडी सुरू झाल्याने सर्दी, पडसे, खोकला, अशा व्हायरल आजारांनीही डोके वर काढले आहे; परंतु आपल्याला झालेली सर्दी ही कोरोनाची आहे की, वातावरणातील बदलामुळे आहे, यातला  फरक कळत नसल्याने अनेक जणांची घाबरगुंडी उडाली आहे.

दोन दिवस असलेले ढगाळ हवामान आणि थंडीमध्ये झालेली वाढ या वातावरणातील बदलाने विषाणूसंसर्गाचा अनेकांना त्रास होत आहे. एरवी अत्यंत सामान्य आजार म्हणून याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, यावर्षी कोरोनाची धास्ती असल्याने घशात होणारी खवखव किंवा झालेली सर्दीही कोरोनाचीच आहे की काय, याची नाहक भीती अनेकांना वाटत आहे. त्यामुळे आपल्यामध्ये दिसून येणारी लक्षणे ही कोरोनाची आहेत, की संसर्गाची, हे न कळल्याने अनेक जण चिंतेत आहेत. सांधेदुखी, कफ या आजारांचे रुग्णही सध्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. थंडीच्या दिवसांत सकाळी चालणे किंवा व्यायामासाठी बाहेर पडणाऱ्यांनी आवर्जून गरम कपडे  परिधान करावेत, तसेच दररोजच्या आहारात कडधान्याचा  समावेश करावा. काकडी, दही व थंड पदार्थांचे अतिसेवन टाळावे, असा सल्लाही  डॉक्टरांनी दिला आहे. 

कोरोना लक्षणांकडे लक्ष ठेवाथंडी वाढल्याने सर्दी, खोकला, किंचितसा ताप, असे आजार डोके वर काढतात; परंतु यावर्षी कोरोनामुळे या आजारांची सर्वसामान्यांमधील भीती वाढली आहे. घसादुखी, सर्दी, नाक गळणे, खोकला जर तीन दिवस औषधी घेऊनही कमी झाला नाही, तर कोविड तपासणी करणे गरजेचे आहे. यासोबतच जर खूप ताप, अंगदुखी, अशक्तपणा, अशी लक्षणे असतील तर मात्र त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. घशात खवखव जाणवताच दिवसातून तीन वेळेस वाफ घेऊन सर्दी लवकर आटोक्यात आणावी. - डॉ.  नीलेश लोमटे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादdoctorडॉक्टर