शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

शाळांतील संगणक कक्ष धूळ खात पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:25 IST

विद्यार्थ्यांना बदलत्या काळात खाजगी शाळांच्या स्पर्धेत टिकता यावे, संगणक ज्ञानातही ते मागे राहू नयेत, यासाठी अनेक शाळांत संगणक कक्ष दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : विद्यार्थ्यांना बदलत्या काळात खाजगी शाळांच्या स्पर्धेत टिकता यावे, संगणक ज्ञानातही ते मागे राहू नयेत, यासाठी अनेक शाळांत संगणक कक्ष दिले आहेत. मात्र त्यातील बहुतांश बंदच आहेत. त्यामुळे या संगणकांची दुरुस्ती करण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून दिल्यास त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.हिंगोली जिल्ह्यात जि.प.च्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शासन योजनेसह खासदार, आमदारांच्या निधीतून अनेक ठिकाणी संगणक कक्ष उभारणी केली होती. यात बहुतेक शाळा या माध्यमिकच्या आहेत. मात्र हे संणगक कालओघात बंद पडले आहेत. काही ठिकाणी या मुलांना शिक्षण देण्यासाठी संगणक शिक्षक होते. नंतर त्यांनाही सर्व शिक्षातील तरतूद बंद झाल्याने कमी करण्यात आले. त्यामुळे हे संगणक धूळ खात पडले. तर इतर शिक्षकांना फारसे संगणक ज्ञानच नसल्याने त्यांनीही कधी धूळ झटकण्याचा प्रयत्न केला नाही. आता यातील किती संगणक वापरण्यायोग्य उरले हाही शोधाचाच विषय आहे. बोटावर मोजण्याइतक्या शाळांत मात्र ही यंत्रणा कार्यान्वित आहे. मात्र या संगणकांची दुरुस्ती केल्यास अनेक शाळांमध्ये पुन्हा निदान संगणक साक्षरतेचे काम तरी करणे शक्य आहे.