भूम : राज्य परिवहन महामंडळाच्या भूम बसस्थानकातून सुटणाऱ्या नियोजित बसेस बंद करून वाहक-चालकांना सक्तीची रजा देण्यात येत आहे़ अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे वाहक-चालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे़याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य परिवहन महामंडळाच्या भूम बसस्थानकातून सुटणाऱ्या काही नियोजित बसेस शनिवारी, रविवारी व इतर सुटीच्या दिवशी बंद करण्याचा प्रकार सुरू करण्यात आला आहे़ या बसेस बंद करून वाहक-चालकांना सक्तीची रजा दिली जात आहे़ त्यामुळे वाहकांसह चालकांचे मोठे नुकसान होत आहे़ ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद घेऊन काम करणाऱ्या बसेसला सुटीच्या दिवशी प्रवासी मिळत नसल्याचे कारण पुढे करून या नियोजित बसेस बंद केल्या जात आहेत़ या प्रकारामुळे वाहक- चालकांना सक्तीची रजा दिली जात आहे़ तर दुसरीकडे यांचे आर्थिक नुकसान होत असून, रजाही वाया जात आहेत़ महामंडळाच्या परिपत्रकानुसार जर काही करणास्तव नियते बंद केली तर चालक-वाहकाना त्या दिवशीची रजा न धरता त्यांना हजेरी देणे बंधनकारक आहे. मात्र, नियते बंद करून वाहक-चालकांना देण्यात येणारी सक्तीची रजा हा चुकीचा प्रकार असल्याचा आरोप होत असून, परिपत्रकानुसार हजेरी लावावी, अशी मागणी होत आहे़महामंडळाच्या उत्पन्नात घटग्रामीण भागातील पाच ते सहा नियती बंद झाल्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नात घट झाली आहे़ त्यामुळे नियतीच्या रजा वरिष्ठांच्या आदेशानुसार दिल्या जात आहेत. नियते बंद झाल्याने नियमित चालक व वाहकास नियमित काम मिळत नाही, असे आगार प्रमुख एस़बी़पडवळ यांनी सांगितले़ (वार्ताहर)
वाहक-चालकांना सक्तीची रजा
By admin | Updated: April 6, 2017 23:33 IST