जालना : नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरु असताना महिंद्र ग्रामीण गृहकर्ज कंपनीकडून ग्रामीण भागात सक्तीची कर्ज वसुली सुरु असून, ती तात्काळ थांबवावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.नापिकीमुळे शेतकरी खंगलेला आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा, पशुधन सांभाळण्याचा, लेकीबाळीच्या लग्नकार्याचा असा एक प्रश्न नाही, तर अनेक प्रश्नांचा तो सामना करीत असताना गृहकर्जाची सक्त वसुली करणे म्हणजे शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे काय, असा सवाल करुन संघटनेमार्फत शेतकऱ्यांना धैर्य देण्याचे काम केले जात आहे. परंतु अशाप्रकारची जाचक वसूली करणे तात्काळ थांबवावे, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष साईनाथ चिन्नदोरे, शेतकरी संघटनेचे सुरेश गवळी, युवा जिल्हाध्यक्ष लक्ष्मण मोहिते यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
ग्रामीण भागात सक्तीची गृहकर्ज वसुली
By admin | Updated: December 19, 2015 23:40 IST