शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
4
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
5
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
6
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
7
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
8
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
9
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
10
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
11
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
12
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
13
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
14
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
15
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
16
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
17
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
18
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
19
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
20
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!

धान्य महोत्सवाला संमिश्र प्रतिसाद

By admin | Updated: May 14, 2014 23:53 IST

हिंगोली : लग्नसराई आणि कडक उन्हाळ्यात ठेवलेल्या धान्य व फळे महोत्सवाचा बुधवारी समारोप झाला.

हिंगोली : लग्नसराई आणि कडक उन्हाळ्यात ठेवलेल्या धान्य व फळे महोत्सवाचा बुधवारी समारोप झाला. फळांत आंबा तर धान्यात भाजीपाल्यांचा बोलबाला राहिला. काही स्टॉल्सवर डाळी तर काही स्टॉल फळांपासून प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे दिसून आले. बाजाराचा दिवस लक्षात घेवून भरविलेल्या या महोत्सवाला जिल्हावासियांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र शासन कृषी व पणन विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) च्या संयुक्त विद्यमाने रामलीला मैदानावर १३ व १४ मे दरम्यान धान्य व फळे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवातून मोठ्या प्रमाणात धान्याची खरेदी-विक्री होण्याची अपेक्षा कृषी विभागाची होती; परंतु महोत्सवाला मध्यम प्रतिसाद मिळाला. धान्याऐवजी भाजीपाल्याचे स्टॉल अधिक दिसून आले. बहुताश स्टॉल फळांपासून बनविलेल्या पदार्थांचे होते. ज्वारी, गहू, तांदूळ, बाजरी, तूर, मूग, उडीद आदी धान्य महोत्सवात दिसून आले नाहीत. फळांमध्ये आंब्याच्या पलीकडे इतर फळे दृष्टीस पडली नाहीत. कच्चे आणि पिकलेले आंब्याचे स्टॉल अधिक प्रमाणात होते. बाजाराच्या तुलनेत येथील केसर आंबा स्वस्त होता. कच्चा आंबा ४० रूपये तर पिकलेला आंबा ८० रूपये किलो दराने विकला जात होता. महोत्सवात सर्वाधिक आंब्याची विक्री झाली. कारण बाजारात आंब्याचे अधिक भाव आणि हमीचा आंबा मिळेनासा झाला. काही जणांनी सोयाबीनचे बियाणे विक्रीसाठी आणले होते. कुदरत जातीचे असलेले बियाणे पेरणीऐवजी लागवड करण्यासाठी फायदेशीर असल्याचे एकनाथ हिंगमिरे यांनी सांगितले. गतवर्षी एका एकरात ५ किलो बियाण्याला १८ पोत्यांचा उतार आल्याचे त्यांनी सांगितले. कापसाच्या बियाण्यातील बोलगार्ड कंपनीचा एकमेव स्टॉल दिसून आला. स्टॉलवर जावून विचारपूस करण्याची तसदी देखील शेतकर्‍यांनी घेतली नाही. बाजारात दुप्पटीपेक्षा कमी दराने डाळी रमेश पंडित यांनी महोत्सवात विकल्या. तूर दाळ ४० तर १ किलो बेसनच्या पॅकसाठी ४० रूपये दर ठेवला होता. दुसरीकडे फळांपासून विविध पदार्थ तयार करणार्‍या जालना येथील एका कंपनीचा स्टॉल लक्षवेधी ठरला. दिवसेंदिवस लुप्त होत असलेल्या घोंगडी विक्रीसाठी ठेवल्या होत्या. बर्‍यापैकी प्रतिसाद या स्टॉलला मिळाला. पुस्तकांच्या स्टॉलने देखील अनेकांचे लक्ष वेधले. महाराष्ट्र शासन कृषी व पणन विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)च्या संयुक्त विद्यमाने रामलीला मैदानावर १३ व १४ मे दरम्यान धान्य व फळे महोत्सवाचे आयोजन केले होते. पहिलाच प्रयोग असलेल्या या महोत्सवाला मध्यम प्रतिसाद मिळाला. धान्याऐवजी भाजीपाल्याचे स्टॉल अधिक दिसून आले. तसेच बहुतांश स्टॉल फळांपासून बनविलेल्या पदार्थांचे होते; परंतु ज्वारी, गहू, तांदूळ, बाजरी, तूर, मूग, उडीद आदी धान्य दिसून आले नाहीत. फळांमध्ये आंब्याच्या पलीकडे इतर फळे दृष्टीस पडली नाहीत. कच्चे आणि पिकलेले आंब्याचे स्टॉल अधिक प्रमाणात होते. मात्र बाजाराच्या तुलनेत येथील केसर आंबा स्वस्त असून कच्चा आंबा ४० रूपये तर पिकलेला आंबा ८० रूपये किलो दराने विकला गेला. फळांपासून विविध पदार्थ तयार करणार्‍या जालना येथील एका कंपनीचा स्टॉल लक्षवेधी ठरला. तूर दाळ ४० तर १ किलो बेसनच्या पॅकसाठी ४० रूपये होता दर.