बीड : येथील पालिकेत कामचुकार कर्मचारी, अधिकारी मोठ्या प्रमाणात आहेत, त्यांच्या कामचुकारपणामुळे वरिष्ठांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत असून आता हे सर्वच कामचुकार अधिकारी कारवाईच्या कचाट्यात सापडले असून मुख्याधिकाऱ्यांनी त्यांना नोटिसा पाठवून वेतन कपातीचे आदेश दिले आहेत.पालिकेच्या कामात गतिमानता यावी, शहरातील नागरीकांच्या तक्रारी जाणून घेत त्यांचा निपटारा व्हावा, या उद्देशाने मुख्याधिकाऱ्यांनी नवीन शक्कल लढवत पलाीकेतील कर्मचाऱ्यांनी दुपारच्यावेळेस तीन ते पाच कार्यालय सोडायचे नाही, असे सक्त आदेश मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांनी २७ जानेवारी रोजी प्रत्येक विभाग प्रमुखांना लेखी पत्राद्वारे दिले होते. सुरूवातीला याची चोख अंमलबजावणी करण्यात आली, मात्र नंतर पहिल्यासारखीच स्थिती झाल्याचे निदर्शनास येताच भालसिंग यांनी शनिवारी प्रशासकीय अधिकारी प्रमोद पाटील यांनी धारेवर धरत या कामचुकार कर्मचाऱ्यांचा अहवाल मागविला असून यामध्ये अधिकाऱ्यांसह कर्मचारी अडकण्याची दाट शक्यता असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.आठवड्यात किती नागरीकांच्या तक्रारी आल्या आणि त्यावर काय कारवाई केली, याचा अहवाल प्रत्येक सोमवारी कार्यालयास सादर करणे आवश्यक होते, तसेच नागरीकांच्या तक्रारी परस्पर वरीष्ठांकडे जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असेही पत्रात आदेशीत होते, मात्र मुख्याधिकाऱ्यांच्या या पत्राला एझी घेत त्याला केराची टोपली दाखविली आहे.शनिवारी खुद्द मुख्याधिकारी यांनी आढावा मागवून घेतला असता यामध्ये बडे अधिकारी अडकण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
पालिकेतील कामचुकार कारवाईच्या कचाट्यात
By admin | Updated: April 20, 2015 00:32 IST