शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

१३ हजार घरकुले पूर्ण

By admin | Updated: September 6, 2014 00:27 IST

नांदेड : मार्च २०१५ पर्यंत ६ हजार ६३९ घरकुलांची कामे पूर्ण करण्याचे आव्हान मनपासमोर आहे़

नांदेड : बीएसयुपी योजनेतंर्गत शहरात १३ हजार घरकुले पूर्ण झाली असून मार्च २०१५ पर्यंत ६ हजार ६३९ घरकुलांची कामे पूर्ण करण्याचे आव्हान मनपासमोर आहे़झोपडपट्टी मुक्त शहराच्या निर्मितीसाठी गोरगरिबांना राहण्यासाठी पक्के घरे देण्याचा महत्वकांक्षी प्रकल्प शहरातील १६८ भागात राबविण्यात येत आहे़ मागील तीन वर्षापासून ही योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी जिव्हाळ्याची बनली आहे़ अनेक अडथळ्यांची मालिका पूर्ण करीत ही योजना उद्दिष्ट पूर्ण करण्याकडे वाटचाल करीत आहे़ शहरात एकूण २७ हजार ९८५ घरकुले बांधण्याचे उद्दिष्ट आहे़ त्यापैकी सध्या १३ हजार घरकुले बांधून पूर्ण झाले आहेत़ तर १६ हजार २१० घरकुलांना मार्कआऊट दिले आहे़ २ हजार ५० लाभार्थी स्वत: बांधकाम करत असून त्यापैकी १ हजार १५० घरे पूर्ण झाले आहेत़ एनटीसी मिल एरियात ५ हजार १३२ घरकुलांचा प्रश्न अद्याप सुटला नाही़ योजनेचा कालावधी संपल्याने हा प्रकल्प रद्द करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले़ मार्च २०१५ पर्यंत २२ हजार ८४९ घरकुले पूर्ण करण्याचा संकल्प मनपाचा आहे़ त्यामुळे राज्यात सर्वाधिक घरकुले बांधण्याचा विक्रम नांदेड महापालिका करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे़ सागंवी भागातील गौतमनगरात २ एकर जागेस शासनाने नुकतीच मंजुरी दिली असून त्याठिकाणी सहाशे घरकुले बांधण्यात येणार आहेत़ रेल्वे स्टेशन परिसर, कॅनॉलरोड व गौतमनगरातील पुनर्वसित लाभार्थ्यांना याठिकाणी घरकुले देण्यात येणार आहेत़ गौतमनगरात १२ बहुमजली इमारतीत २१६ फ्लॅटचे काम पूर्ण झाले असून त्याठिकाणी लाभार्थी राहत आहेत़ ब्रह्मपुरी येथील कामे ठप्पबीएसयुपी योजनेतंर्गत घरकुलांचे कामे जलदगतीने सुरू असतानाच ब्रह्मपुरी येथील घरकुलांचे कामे मात्र रेंगाळली आहेत़ तत्कालीन आयुक्त जी़ श्रीकांत यांच्या बदलीनंतर याभागातील कामांची गती मंदावली आहे़ त्यामुळे लाभार्थी अडचणीत सापडले आहेत़ (प्रतिनिधी)लालवाडीत १२ घरकुलांचे वाटपरेल्वे विभागाकडून विकास कामे करताना लालवाडी भागातील रेल्वेलाईन लगत राहणाऱ्या गोरगरीब नागरिकांची घरे काढण्यात आली होती़ त्यामुळे येथील नागरिकांच्या घरांचा प्रश्न समोर होता़ तेव्हा उघड्यावर पडलेल्या या कुटुंबांना महापालिकेने आधार दिला़ बीएसयुपी योजनेतंर्गत लालवाडी येथील १२ कुटुंबांना गुरूवारी घरे वाटप करण्यात आली़ यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दाटला़ महापौर अब्दुल सत्तार यांच्या हस्ते घरकुलांचे वाटप करण्यात आले़ यावेळी नगरसेविका अंजली गायकवाड, बाळासाहेब देशमुख, येवनकर, सरजितसिंघ गील, बीएसयुपी विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांची उपस्थिती होती़