शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात समता परिषद मैदानात;पोलीस स्टेशनमध्ये दिला तक्रार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 16:23 IST

चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध जाहिररित्या धमकावणे, सत्तेच्या जोरावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करणे व ओबीसी व माळी समाजाच्या भावना दुखावणे याबद्दल तात्काळ गुन्हा नोंदविण्यात यावा असे निवेदनात म्हटले आहे.

ठळक मुद्देचंद्रकांत पाटील यांच्या विरोधात समता परिषद मैदानात औरंगाबादच्या एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये दिली तक्रार

औरंगाबाद:भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दि.०२ मे रोजी विविध वृत्तवाहिन्यांवर ओबीसी समाजाचे नेते व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना चूप बसा, जास्त बोललात तर महागात पडेल अशी जाहीर धमकी दिल्याच्या निषेधार्थ आज अ.भा.समता परिषदेच्या औरंगाबाद जिल्हा शाखेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे यांची भेट घेऊन पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी तक्रार अर्ज दाखल केला.

ममता बॅनर्जी यांच्या पश्चिम बंगाल मधील विजयावर भुजबळ यांनी प्रतिक्रिया नोंदवल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी ही धमकी दिली होती. चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध जाहिररित्या धमकावणे, सत्तेच्या जोरावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करणे व ओबीसी व माळी समाजाच्या भावना दुखावणे याबद्दल तात्काळ गुन्हा नोंदविण्यात यावा असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष मनोज घोडके, चंद्रकांत पेहरकर, संदीप घोडके, योगेश हेकाडे, नागेश हिवाळे आदींनी हा तक्रार अर्ज सादर केला. पोलिस उपनिरीक्षक संदीप बागूल यांनी निवेदन स्वीकारले व याबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पुढील कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले.

काय आहे प्रकरण छगन भुजबळ यांनी पश्चिम बंगालच्या निकालावर प्रतिक्रिया दिली होती. यात भुजबळ यांनी भाजपच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. "बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जवळपास दिवसाआड सभा घेत होते. त्यांचे ८ ते १० मंत्री मतदारसंघात ठाण मांडून बसले होते. पण उपयोग झाला नाही. देशात आता भाजपविरोधी लाट तयार झाली आहे", असा टोला भुजबळ यांनी लगावला होता. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी भुजबळ यांना थेट इशाराच दिला आहे. "छगन भुजबळ यांनी पंढरपूरच्या निकालावर प्रतिक्रिया द्यावी. तुम्ही जामिनावर सुटलेले आहात. तुम्ही काही निर्दोष सुटलेले नाहीत. त्यामुळे जास्त जोरात बोलू नका अन्यथा फार महागात पडेल. बोलायचं असेल तर पंढरपूर, पद्दुचेरी आणि आसामवर बोला", असं चंद्रकात पाटील म्हणाले. 

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळchandrakant patilचंद्रकांत पाटीलAurangabadऔरंगाबाद