फकिरा देशमुख , भोकरदन नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत एकमेकासमोर प्रतिस्पर्धी म्हणून निवडणूक लढविलेले महायुतीचे खा़ रावसाहेब दानवे व काँग्रेस आघाडीचे विलास औताडे हे दोन्ही उमेदवार मनसेचे जिल्हाध्यक्ष सांडू पुंगळे यांच्या कन्येच्या विवाहानिमित्त शेजारी-शेजारी बसल्याने हा विषय वºहाडींमध्ये चर्चेचा ठरला. ११ मे रोजी सायंकाळी राजूर येथे मनसेचे जिल्हाध्यक्ष सांडू पुंगळे यांच्या कन्येचा विवाह पार पडला. पुंगळे यांचे सर्वच पक्षाच्या नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबध असल्याने सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी विवाह सोहळ्यात हजेरी लावली. या समारंभासाठी खा़रावसाहेब दानवे, आ़ चंद्रकांत दानवे, आ़ संतोष सांबरे, लोकसभेतील काँग्रेस आघाडीचे उमेदवार विलास औताडे, माजी सभापती लक्ष्मणराव दळवी, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख, मनसेचे सुनील आर्दड, शिवाजी थोटे, माऊली गायकवाड, बबलू चौधरी, बाबूराव खरात यांच्यासह भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रमुख मान्यवरांसाठी विशेष आसन व्यवस्था करण्यात आली होती. संयोजकांनी खा. दानवे व आ. दानवे यांच्यामध्ये असलेल्या खुर्चीवर विलास औताडे यांना जागा करून दिली. त्यामुळे खासदार व आमदारांना शेजारी बसण्याचा योग आला. विशेष म्हणजे हे दोघेही कधी शेजारी-शेजारी बसत नसल्याची चर्चा या सोहळ्यात ऐकावयास मिळाली. विलास औताडे हे मात्र दोन्ही दानवेंच्यामध्ये बसले. त्यामुळे त्यांच्या एका बाजूला लोकसभा निवडणुकीतील प्रतिस्पर्धी महायुतीचे खा़ दानवे तर दुसर्या बाजूला मित्र पक्षाचे आ़ दानवे विराजमान झाले. यावेळी औताडे व दानवे यांच्यात मोजकेच संभाषण झाले. मात्र, तरीही या प्रकारामुळे आजुबाजुला बसलेल्या अनेकांचे कान टवकारले. हे दोन्ही उमेदवार ‘कोणी कोणाचे काम केले’ हे तर एकमेकांना सांगत नसतील ना, अशी शंका अनेकांना आली. या निवडणुकीत मनसेने उमेदवार दिला नसल्याने त्यांचा पाठिंबा घेण्यासाठी खा़ दानवे व औताडे यांनी जोरदार प्रयत्न केले होते. यावेळी मनसेने ज्याला जसे पटेल, त्या उमेदवाराचे काम केल्याचे सांगण्यात येते. मात्र, मनसेने आपलेच काम केले असे, या दोन्ही उमेदवारांना वाटत आहे. वºहाडींना मात्र आश्चर्याचा धक्का बसला. निवडणुकीत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे नेते विवाहाच्या निमित्ताने का होईना; खुर्चीला खुर्ची लावून शेजारी बसले होते. या प्रकारामुळे वºहाडींमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. मनोगतातून चिमटे दोन्ही उमेदवार या सोहळ्यास आवर्जून हजर होते. खा़ दानवे व आ़ दानवे यांनी मनोगत व्यक्त केले. ‘सांडू अण्णांनी सर्व पक्षीय नेत्यांना एकत्र केले आहे, ही कला त्याच्याकडून शिकली पाहिजे, असे सांगून दोन्ही दानवेंनी एकमेकांना चिमटा काढला.
प्रतिस्पर्धी उमेदवार बसले मांडीला मांडी लावून
By admin | Updated: May 13, 2014 01:11 IST