शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयांना संलग्नता न देताच पाठविल्या समित्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 23:35 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या शेकडो महाविद्यालयांना मागील वर्षी पाठविलेल्या समित्यांच्या अहवालानंतर संलग्नता प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. तरीही या महाविद्यालयांमध्ये आगामी वर्षाची संलग्नता देण्यासाठी समित्या पाठविण्यात आल्या आहेत. मागील वर्षी संलग्नता न दिलेल्या महाविद्यालयांची संख्या १०० पेक्षा अधिक असल्याचा दावा व्यवस्थापन परिषदेचे सदस्य संजय निंबाळकर यांनी केला.

ठळक मुद्दे विद्यापीठ : पाठविलेल्या समित्या मागतात मागील वर्षीचे संलग्नता प्रमाणपत्र

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या शेकडो महाविद्यालयांना मागील वर्षी पाठविलेल्या समित्यांच्या अहवालानंतर संलग्नता प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. तरीही या महाविद्यालयांमध्ये आगामी वर्षाची संलग्नता देण्यासाठी समित्या पाठविण्यात आल्या आहेत. मागील वर्षी संलग्नता न दिलेल्या महाविद्यालयांची संख्या १०० पेक्षा अधिक असल्याचा दावा व्यवस्थापन परिषदेचे सदस्य संजय निंबाळकर यांनी केला.विद्यापीठ प्रशासनाने महाविद्यालयांतील सोयी- सुविधांची तपासणी करून संलग्नता देण्यासाठी समित्या पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. समित्यावर सदस्यांची निवड करताना मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा आरोप होत आहे. अपात्र लोकांनाही समित्यांवर पाठविण्यात आले आहे. व्यवस्थापन परिषदेने गुणवत्ता, दर्जा राखण्यासाठी ‘नॅक’ झालेल्या महाविद्यालयांतील प्राध्यापकांनाच समित्यांवर पाठविण्याचा ठराव मंजूर केला होता. मात्र त्या ठरावाची अंमलबजावणी झालेली नाही. याच वेळी मागील वर्षी संलग्नता समित्यांनी दिलेल्या अहवालानंतर संंबंधित महाविद्यालयांना कळविण्यात आलेले नाही. यावर्षी समित्या गेल्यानंतर मागील वर्षाची संलग्नता मागतात. तेव्हा विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाशी संपर्क साधावा लागतो. तेथून संलग्नता प्रमाणपत्र घेण्यासाठीही आर्थिक देवाण-घेवाण करावी लागते. त्याशिवाय प्रस्तावच सापडत नाही, अशी माहिती नाव न छापण्याच्या अटीवर एका प्राचार्यांनी दिली. संलग्नता समित्या अहवाल देण्यासाठी पैशाची देवघेव करीत असतानाच अहवालानंतरही प्रमाणपत्रासाठी पैसे द्यावे लागत आहेत. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने सोयी-सुविधा न पुरविणाऱ्या महाविद्यालयांवर कडक कारवाई करावी, त्यांची संलग्नता रद्द करण्याचीही कार्यवाही करावी, यासाठी समित्यांवर सक्षम लोकांना पाठविले पाहिजे, असेही संजय निंबाळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.चौकटचतुर्थ श्रेणी कर्मचाºयाला बनविले समिती अध्यक्षऔरंगाबाद शहरातील एका प्रतिष्ठित महाविद्यालयाच्या संलग्नता समितीवर त्याच संस्थेच्या माजलगाव येथील महाविद्यालयात चतुर्थ श्रेणीपदावर कार्यरत असलेल्या एका कर्मचाºयाला समितीचे अध्यक्ष बनविण्यात आले होते. ही चूक लक्षात आल्यानंतर तात्काळ समितीचा अध्यक्ष बदलून देण्यात आल्याची माहिती एका व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.चौकटप्रश्नाला मार्क किती हेच समजत नाहीविद्यापीठ महाविद्यालयांमध्ये समित्या पाठविते. मात्र त्या समित्यांकडून पाहणी करण्यात येताना काही प्रश्नावली भरून घेण्यात येते. या प्रश्नांना १०० पैकी किती गुण दिले जातात हे समितीच्या सदस्यांसह संस्थाचालक, प्राचार्यांनाही माहीत नाही. त्या महाविद्यालयाला किती मार्क मिळाले हेसुद्धा कळविण्यात येत नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.-------------

टॅग्स :Educationशिक्षणcollegeमहाविद्यालयuniversityविद्यापीठ