शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगर, नांदेड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील औषधोपचार सेवांचा समितीकडून अभ्यास सुरू

By संतोष हिरेमठ | Updated: April 29, 2025 11:38 IST

छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास भेट देऊन पायाभूत सुविधा, औषधोपचार सेवांबाबत अभ्यास केला जाईल.

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर व नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पायाभूत सुविधा आणि औषधोपचार सेवांबाबत अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. समितीकडून अभ्यास सुरू देखील करण्यात आला असून, यातून अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना सुचविणारा अहवाल तयार करण्यात येणार आहे.

उच्च न्यायालयात सुमोटो जनहित याचिकेत २७ मार्च रोजीच्या सुनावणीत छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील पायाभूत सुविधा, औषधोपचार सेवांबाबत तपशीलवार अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्याचे निर्देश दिले. त्या अनुषंगाने वैद्यकीय शिक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. समितीत ५ सदस्यांचा समावेश आहे. या समितीने २६ एप्रिल छत्रपती संभाजीनगरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास (घाटी) भेट दिली. समितीने अपघात विभाग, आयसीयू, सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटलसह विविध सोयीसुविधांची पाहणी करीत आढावा घेतला.

१६ जूनपूर्वी होणार अहवाल सादरछत्रपती संभाजीनगर आणि नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास भेट देऊन पायाभूत सुविधा, औषधोपचार सेवांबाबत अभ्यास केला जाईल. उच्च न्यायालयाने निर्देशित केल्यानुसार अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना सुचविणारा सविस्तर अहवाल १६ जूनपूर्वी न्यायालयात सादर करण्यात येणार आहे.

‘लोकमत’ने मांडली होती स्थितीनांदेड आणि छत्रपती संभाजीनगरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २४ ते ४८ तासांत मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या व परिस्थितीविषयी ‘लोकमत’ने ३ ऑक्टोबर २०२३ रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. हे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या आरोग्य यंत्रणेने या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील परिस्थिती बदलण्यासाठी पाऊल उचलले. घाटी रुग्णालयात ‘चिठ्ठीमुक्त घाटी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. येथे आता ९० ते ९५ टक्के औषधी रुग्णांना मोफत दिल्या जात असल्याचा दावा केला जातो.

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीNanded civil hospitalजिल्हा रुग्णालय नांदेड