शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता कराचे वाद मिटविण्यासाठी नेमलेली समितीच वादाच्या भोवऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 18:58 IST

मालमत्ता करासंदर्भात हजारो वाद आहेत. याचा निपटारा करण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांनी एक समिती गठित केली आहे.

औरंगाबाद : मालमत्ता करासंदर्भात हजारो वाद आहेत. याचा निपटारा करण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांनी एक समिती गठित केली आहे. या समितीने रविवारी महापालिका सर्वसाधारण सभेच्या सभागृहात सुनावण्या घेतल्या. मोजून पंधरा मालमत्ताधारक या समितीसमोर हजर झाले. समितीने दिवसभरात एकाही प्रकरणाचा न्यायनिवाडा केला नाही. मालमत्ता कराचा अजिबात गंध नसलेले अधिकारी या समितीत निवडण्यात आले. अतिरिक्त आयुक्तांना अधिकार नसताना त्यांनी ही समिती स्थापन केल्याचा नवीन तंटा समोर आला आहे.

मालमत्ता करासंदर्भात कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार कायद्यानुसार आयुक्त, करमूल्य निर्धारण अधिकाऱ्यांना आहे. अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी मालमत्ता कराशी संबंधित असलेले वाद संपुष्टात आणण्यासाठी एक समिती स्थापण केली. या समितीत करनिर्धारण विभागाचे वसंत निकम, उपअभियंता एस.एस. कुलकर्णी, अग्निशमन अधिकारी आर.के. सुरे, शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, विधि सल्लागार अपर्णा थेटे आदींची नियुक्ती केली.

समितीने रविवारी सकाळी महापालिका कार्यालयातील सर्वसाधारण सभेच्या सभागृहात तंटामुक्तीची प्रकरणे हाताळण्यास सुरुवात केली. करमूल्य निर्धारण विभागाचे प्रभारी प्रमुख महावीर पाटणी यावेळी उपस्थित नव्हते. विधि सल्लागारही उपस्थित नव्हत्या. समितीमधील चारच अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तंटामुक्तीची प्रकरणे हाताळण्यास सुरुवात करण्यात आली. समोर आलेल्या एकाही प्रकरणाचा अंतिम न्यायनिवाडा समिती करू शकली नाही.

प्रत्येक प्रकरण वेगवेगळ्या विभागांकडे किंवा वॉर्ड अधिकाऱ्यांकडे टोलाविण्याचे काम दिवसभर सुरू होते. समितीच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेलेही यावेळी हजर होते. त्यांनीही समितीचा उत्साह वाढविण्याचे काम केले. समितीने घेतलेल्या निर्णयासंदर्भात उद्या एखादे प्रकरण न्यायालयात गेल्यास समितीच्या अधिकाराचा प्रश्न उपस्थित होणार आहे. त्यामुळे दिवसभर समिती आलेले प्रकरण टोलवून देण्याचे काम करीत होती. 

व्याज माफीही वादातमहापालिका १२ नोव्हेंबरपासून मालमत्ता करावरील दंड आणि व्याजावर ७५ टक्केमाफी देत आहे. महापालिका अधिनियम ४७-ब नुसार मनपा प्रशासन आणि राज्य शासनाला माफी योजना राबविता येऊ शकते.औरंगाबाद मनपाने सुरू केलेल्या व्याज माफ करण्याच्या योजनेला आयुक्तांची मंजुरीच नसल्याची माहिती समोर आली आहे. राज्य शासनाची मंजुरीही घेण्याची तसदी मनपाने घेतली नाही. उद्या हे प्रकरण अंगलट आल्यास महापालिका काय करणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. 

आमिषापोटी कर भरणाव्याज आणि दंडमाफीपोटी शहरातील सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिक कोट्यवधी रुपये महापालिकेकडे भरत आहेत. वॉर्ड अधिकारी, वसुली अधिकारी, संनियंत्रण अधिकारी आम्हीच ही वसुली करतोय म्हणून स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या क्षमतेनुसार किती वसुली केली याचे उत्तर प्रशासनाकडे नाही.

नागरिकांना माहितीच नाहीमालमत्ता करासंदर्भातील वाद संपुष्टात आणण्यासाठी मनपाने एक समिती स्थापन केली आहे. समिती रविवारी नागरिकांचे गाºहाणे ऐकणार असल्याची माहिती माध्यमे आणि नागरिकांना देण्यात आली नाही. त्यामुळे दिवसभरात फक्त १५ प्रकरणे समितीसमोर आले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाTaxकरMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद