शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

मतदान यंत्र देण्यास आयोगाचा नकार

By admin | Updated: December 2, 2014 01:09 IST

औरंगाबाद : छावणी परिषदेच्या निवडणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) देण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने नकार दिला आहे

औरंगाबाद : छावणी परिषदेच्या निवडणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) देण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने नकार दिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आता राज्य निवडणूक आयोगाकडे मतदान यंत्रांची मागणी केली आहे. राज्य निवडणूक आयोगानेही नकार दिल्यास छावणी परिषदेच्या निवडणुकीत मतदान यंत्रांऐवजी जुन्याच पद्धतीने मतपत्रिकांचा वापर करावा लागणार आहे. औरंगाबादेतील छावणी परिषदेची निवडणूक ११ जानेवारी रोजी होत आहे. संरक्षण खात्याने परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर केला आहे. जिल्हा प्रशासनातर्फेच ही निवडणूक घेतली जाणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी संभाजी अडकुणे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. छावणी परिषदेच्या याआधीच्या निवडणुकांमध्ये जिल्हा प्रशासनाकडूनच मतपेट्या पुरविण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, अलीकडच्या काळात निवडणुकीसाठी सर्वत्र मतदान यंत्रांचा वापर सुरू झाला आहे. त्यामुळे यावेळी छावणी परिषदेच्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडील मतदान यंत्र वापरण्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे परवानगी मागण्यात आली होती. मात्र, आयोगाने त्यास नकार दिला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची मतदान यंत्रे इतर कुणालाही देण्याचे धोरण नसल्याचे आयोगाने कळविले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आता राज्य निवडणूक आयोगाकडे मतदान यंत्र वापरण्याबाबत परवानगी मागितली आहे. राज्य आयोगानेही परवानगी नाकारल्यास मग मात्र छावणी परिषदेची निवडणूक जुन्याच पद्धतीने म्हणजे मतपत्रिकांचा वापर करून घ्यावी लागणार आहे. ४छावणी परिषदेत सात वार्ड आहेत. या सात वार्डांत प्रत्येक दोन मतदान केंद्रे असण्याची शक्यता आहे. प्रत्येक केंद्रावर दोन याप्रमाणे सुमारे ३० मतदान यंत्रांचीच गरज भासणार आहे. ४राज्य आयोगाने परवानगी दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाकडे उपलब्ध असलेली मतदान यंत्रे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. मात्र, अशी परवानगी न मिळाल्यास जिल्हा प्रशासन मतपेट्या आणि मतपत्रिका उपलब्ध करून देईल. केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदान यंत्र वापरण्यास परवानगी दिलेली नाही. म्हणून राज्य निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली आहे. त्यांनी परवानगी न दिल्यास मतपत्रिका आणि मतपेट्यांचाच वापर करावा लागणार आहे. -शशिकांत हदगल, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी