शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
3
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
4
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
5
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
6
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
7
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
8
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
9
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
10
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
11
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
12
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
13
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
14
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
15
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
16
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
17
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
18
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
19
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
20
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं

आयुक्तांनी घेतला ‘गुरुजीं’ चा वर्ग

By admin | Updated: June 18, 2016 01:05 IST

औरंगाबाद : शहरातील सर्वच छोट्या- मोठ्या खाजगी कोचिंग क्लासचालकांचाच शुक्रवारी ‘वर्ग’ भरला. स्थळ होते पोलीस आयुक्तालय अन् सर होते पोलीस आयुक्त अमितेशकुमार...

औरंगाबाद : शहरातील सर्वच छोट्या- मोठ्या खाजगी कोचिंग क्लासचालकांचाच शुक्रवारी ‘वर्ग’ भरला. स्थळ होते पोलीस आयुक्तालय अन् सर होते पोलीस आयुक्त अमितेशकुमार... क्लाससमोरील बेशिस्त पार्किंग, सुरक्षा व्यवस्थेचा अभाव आणि विद्यार्थिनींच्या छेडछाडीचे प्रकार रोखण्याबाबत काय उपाययोजना कराव्यात, यावर अमितेश ‘सरांनी’ क्लासचालक गुरुजींना चांगलाच शिस्तीचा ‘धडा’ शिकविला... शहरातील वाहतुकीचा प्रश्न बिकट बनलेला आहे. त्यात मोठ्या शहरातील छोट्या- मोठ्या कोचिंग क्लासेससमोरील बेशिस्त पार्किंग अधिकच भर घालीत आहे. यातील बहुतांश क्लासेसला पार्किंगची स्वत:ची जागाच नाही. त्यामुळे येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांची वाहने रस्त्यांवरच उभी केली जातात. ज्यामुळे वाहतुकीला सतत अडथळा निर्माण होतो. त्याचा त्रास परिसरातील नागरिकांनाही होतो. क्लासेसच्या परिसरातील नागरिकांनी या बेशिस्त पार्किंगबाबत पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. याशिवाय क्लासेसच्या परिसरात टवाळखोरांकडून विद्यार्थिनींना त्रास दिल्या जात असल्याच्याही तक्रारी होत्या. याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शुक्रवारी शहरातील सर्व कोचिंग क्लासचालकांची आयुक्तालयात बैठक बोलावली. या बैठकीला छोटे- मोठे असे सुमारे तीनशे कोचिंग क्लासचालक उपस्थित होते. पार्किंग व्यवस्था करायावेळी अमितेशकुमार यांनी सर्व क्लासचालकांना पार्किंग व्यवस्था करण्याचे आदेश दिले. तुमच्याकडे येणारी मुले रस्त्यावर बेशिस्त पार्किंग करणार नाहीत, याची काळजी तुम्हीच घ्या. विद्यार्थी व्यवस्थित पार्किंग करतील, यासाठी वॉचमन ठेवा, असे आयुक्तांनी सुचविले. याशिवाय ज्या मुलांना त्यांचे पालक चारचाकी वाहनाने ने- आण करतात, त्या पालकांना वाहन दूर रस्त्याच्या कडेला उभे करून तेथून मुलाला पायी आणून सोडण्याची विनंती करा, असाही आयुक्तांनी क्लासचालकांना सल्ला दिला. कोणत्याही परिस्थितीत वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याचे त्यांना बजावण्यात आले. त्याबरोबरच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून क्लासचालकांनी आपल्या क्लासच्या आवारात सुरक्षारक्षक नेमावा, सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, अशाही सूचना देण्यात आल्या.