शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्त हटावच्या तलवारी म्यान

By admin | Updated: September 12, 2016 23:24 IST

औरंगाबाद : महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्यावर अविश्वास ठराव आणून त्यांना परत शासन दरबारी पाठविण्यासाठी शिवसेना-भाजपने कंबर कसली होती.

औरंगाबाद : महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्यावर अविश्वास ठराव आणून त्यांना परत शासन दरबारी पाठविण्यासाठी शिवसेना-भाजपने कंबर कसली होती. युतीच्या नेत्यांनी अविश्वास ठरावाकडे न जाता विद्यमान आयुक्तांकडून व्यवस्थित काम करून घ्या, अशा कानपिचक्या देण्यात आल्या. त्यामुळे अविश्वास ठरावासाठी प्रयत्नशील असलेल्या पदाधिकाऱ्यांनीही आपल्या तलवारी म्यान केल्या. ‘एमआयएम’ पक्षात उघडपणे दोन गट पडले. या पक्षानेही अविश्वासाच्या मुद्यावर अगोदर युतीसोबत ‘विश्वास’ दाखविला आणि नंतर यू-टर्न घेतला.६ सप्टेंबर रोजी मनपाची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. शहरातील खड्ड्यांसाठी आयोजित सभेत एमआयएमच्या एका नगरसेवकाने अधिकाऱ्यांना ‘गेंड्याची कातडी’ झाली आहे, असा वाक्यप्रचार केला. त्यामुळे मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्यासह अधिकाऱ्यांनी चक्क सर्वसाधारण सभेवर बहिष्कार घातला. या घटनेमुळे मनपा पदाधिकारीही क्षणभर अवाक् झाले होते. महापालिकेच्या सर्वोच्च सभागृहाचा आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी अवमान केला. आयुक्तांनी माफी मागावी, उद्यापासून आयुक्तांना मनपात न येऊ देणे आदी मनसुबे पदाधिकाऱ्यांनी आखून ठेवले. सेनेचे दोन पदाधिकारी दुसऱ्याच दिवशी कोकणमध्ये पालकमंत्री रामदास कदम यांना भेटायला गेले. भाजपचे एक पदाधिकारी भोकरदनला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना भेटायला गेले. युतीच्या दोन्ही नेत्यांनी अविश्वास ठराव नको, आहेत त्या आयुक्तांकडून काम करून घेण्याचा कानमंत्र दिला. सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांनी सांगितले की, एमआयएमच्या नगरसेवकाने सभागृहात तो शब्दप्रयोग केला होता. त्यांनाच मान-सन्मान नसेल तर युतीलाही काही देणे-घेणे नाही. आम्ही असा कोणताच ठराव यापुढे तरी आणणार नाही.भाजपची स्वतंत्र बैठकसोमवारी भाजपच्या कार्यालयात सर्व नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. यावेळी विधानसभेचे सभापती तथा ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे, आ. अतुल सावे, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी आदी उपस्थित होते. यावेळी नगरसेवकांनी वॉर्डात विकासकामे होत नसल्याची तक्रार केली. रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा आदी तक्रारीच जास्त होत्या. उपस्थित नेत्यांनीही नगरसेवकांचे दु:ख ऐकून घेतले. १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरात येणार आहेत. त्यांच्या कानावर वस्तुस्थिती टाकण्यात येईल, असा सल्ला ज्येष्ठ नेत्यांनी दिला. यावेळी हरिभाऊ बागडे यांनी सर्व नगरसेवकांना अविश्वास ठरावाच्या भानगडीत अजिबात पडू नका. विद्यमान आयुक्तांसोबत काम करा, असा ‘बुजुर्ग’पणाचा सल्ला दिला.