शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

दिल्सादायक ! कोरोनाच्या गंभीर रुग्णांत 77 टक्के घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 16:05 IST

गंभीर रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने दिलासादायक चित्र सरकारी रुग्णालयांत पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देपूर्वीपेक्षा ऑक्सिजन वापर ३० टक्क्यांखाली

-  संतोष हिरेमठऔरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची स‌र्वत्र भीती व्यक्त होताना गंभीर रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने दिलासादायक चित्र सरकारी रुग्णालयांत पाहायला मिळत आहे.  एकट्या घाटीत दाखल होणाऱ्या गंभीर रुग्णांची संख्या ७७ टक्क्यांनी कमी झाली आहे. परिणामी, गंभीर रुग्ण कमी झाल्याने शहरातील सरकारी रुग्णालयांत ऑक्सिजनचा वापर पूर्वीच्या तुलनेत सध्या ३० टक्क्यांखाली आला आहे.

जिल्ह्यात दिवाळीनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी वाढ झाल्याने चिंता व्यक्त झाली; परंतु सध्या गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी असल्याचे पहायला मिळत आहे. आजघडीला घाटी आणि जिल्हा रुग्णालयात दाखल कोरोना रुग्णांची संख्या शंभराखाली आहे. घाटीत २४ सप्टेंबर रोजी गंभीर रुग्णांची संख्या रेकाॅर्ड ब्रेक म्हणजे तब्बल २३० होती; परंतु त्यानंतर घाटीत दाखल रुग्णांची संख्या कमी होत गेली. घाटीत शनिवारी गंभीर ५३ रुग्ण भरती होते. पूर्वीच्या तुलनेत ७७ टक्के रुग्ण कमी झाले असून, सध्या केवळ २३ टक्के गंभीर रुग्ण दाखल आहेत. गंभीर रुग्णांची संख्या कमी असल्याने ऑक्सिजनची मागणी कमी झाल्याचे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले. तर ३०० खाटांची सुविधा असलेल्या जिल्हा रुग्णालयात सध्या केवळ ४६ रुग्ण भरती आहेत. यात केवळ ३ रुग्ण आयसीयूत दाखल असल्याचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर यांनी सांगितले.

पूर्वी १४ हजार, आता रोज ४ हजार लिटरघाटी रुग्णालयात पूर्वी रोज १४ हजार लिटर ऑक्सिजन लागत होता. त्यासाठी २४ तासांत दोन ऑक्सिजन टँकर येत होते. आता मात्र, केवळ रोज ४ हजार लिटर ऑक्सिजन लागत आहे. दोन दिवसाला एकदा टँकर येत असल्याचे डॉ. राजश्री सोनवणे यांनी सांगितले.

१२० वरून आता २० ते ३० सिलिंडरजिल्हा रुग्णालयात आधी रोज जवळपास १२० ऑक्सिजन सिलिंडर लागत होते. आजघडीला रोज २० - ३० सिलिंडर लागत आहेत. ऑक्सिजनची मागणी २० टक्क्यांवर आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद