शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

दिलासा: शहरात तीन महिन्यांनंतर कोरोना रुग्णसंख्या शंभराखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:04 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात ३१८ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील ९९, तर ग्रामीण भागातील २१९ रुग्णांचा ...

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात ३१८ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील ९९, तर ग्रामीण भागातील २१९ रुग्णांचा समावेश आहे. तब्बल ३ महिन्यांनंतर शहरातील रुग्णसंख्या शंभराखाली आली. दिवसभरात ४४२ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. तर गेल्या २४ तासांत २१ रुग्णांचा मृत्यू झाला. यात औरंगाबाद जिल्ह्यातील १७ रुग्णांचा आणि अन्य जिल्ह्यातील ४ रुग्णांचा समावेश आहे. यात दोन रुग्णांना कोरोनासह म्युकरमायकोसिसचे निदान झाले होते. जिल्ह्यात सध्या ४ हजार ८७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.शहरात १६ फेब्रुवारी रोजी ९६ रुग्ण आढळले होते. त्यानंतर शंभरावर रुग्णसंख्या गेली होती. शहरातील रुग्णसंख्येने एक हजाराचाही आकडा पार केला होता; परंतु ही संख्या शंभराखाली आली आहे. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख ४१ हजार ४५१ एवढी झाली आहे, तर आतापर्यंत एक लाख ३३ हजार ४५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,१२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील २०० आणि ग्रामीण भागातील २४२ अशा ४४२ रुग्णांना सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना सिल्लोड येथील २९ वर्षीय पुरुष, सातारा परिसरातील ७७ वर्षीय पुरुष, व्यकंटेश काॅलनीतील ५६ वर्षीय महिला, शाहसोक्ता काॅलनीतील ३२ वर्षीय महिला, कन्नड येथील ४५ वर्षीय महिला, हनुमाननगर, गंगापूर येथील ४१ वर्षीय पुरुष, हर्सूल येथील ६० वर्षीय महिला, पडेगाव येथील ५५ वर्षीय पुरुष (म्युकरमायकोसिस), वांजरगाव, वैजापूर येथील ६५ वर्षीय पुरुष, धोंदलगाव, वैजापूर येथील ५० वर्षीय महिला, वजनापूर,गंगापूर येथील ६५ वर्षीय महिला, मयूर पार्क येथील ८८ वर्षीय महिला, केकटजळगाव, पैठण येथील ६० वर्षीय महिला, गव्हाली, कन्नड येथील ३३ वर्षीय पुरुष, शिवराई (बनशेंद्रा), कन्नड येथील ६५ वर्षीय महिला, मिलकार्नर येथील ४६ वर्षीय पुरुष, उल्कानगरी येथील ७६ वर्षीय पुरुष आणि जालना जिल्ह्यातील ७५ वर्षीय महिला, निलंगा, लातूर येथील ६५ वर्षीय पुरुष (म्युकरमायकोसिस), अहमदनगर जिल्ह्यातील ३५ वर्षीय पुरुष, ५० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

औरंगाबाद ३, सातारा परिसर ३, बीड बायपास १, जय भवानी नगर ३, पुष्पनगरी १, कांचनवाडी १, सिल्कमिल कॉलनी १, घाटी २, जुने शहर १, एन-११ येथे ३, मयुरबन कॉलनी १, बन्सीलालनगर १, भावसिंगपुरा ३, मुकुंदवाडी १, राजनगर ३, एन-६ येथे १, एन-२ येथे २, न्यू एस. टी. कॉलनी १, रामकृष्ण नगर १, राम नगर २, चिकलठाणा १, नारेगाव १, एन-८ येथे १, एन-७ येथे १, म्हाडा कॉलनी १, दिशा विनायक परिसर १, दिशानगरी १, देवळाई रोड १, शहानूरवाडी २, चेतक घोडा १, ज्योतीनगर १, न्यु पहाडसिंगपूरा १, मयुरपार्क १, टी. व्ही. सेंटर २, पडेगाव ५, एन-१ येथे २, घृष्णेश्वर कॉलनी २, जाधववाडी १, हडको १, ईएसआयसी हॉस्पीटल १, मिटमिटा १, संजय नगर १, रेणूकुल भगवती कॉलनी १, एसबीएच कॉलनी १, अल्तमश कॉलनी १, आंबेडकरनगर १, देवळाई परिसर १, नाथप्रांगण गारखेडा १, समर्थनगर ३, पद्मपूरा १, ईटखेडा १, एमआयडीसी कॉलनी रेल्वेस्टेशन १, मिलिट्री हॉस्पिटल १, एन-५ येथे १, अन्य २०

ग्रामीण भागातील रुग्ण

बजाजनगर ३, वडगाव कोल्हाटी १, गौर पिंप्री ता.कन्नड १, साऊथ सिटी १, पवननगर, रांजणगाव १, सिडको वाळूज महानगर-१ येथे २, गुडम तांडा १, विश्वबन सोसायटी हिरापूर ३, पिसादेवी ३, कासोद ता. सिल्लोड १, बिडकीन ता. पैठण १, खंडाळा ता. सिल्लोड १, एफडीसी सोसायटी १, न्यु जोगेश्वरी ता. गंगापूर १, गोर पिंपरी १, आडगाव बुद्रुक १, लक्ष्मीनगर, वाळूज १, पैठण १, लाडसावंगी १, अन्य १९३

---

रुग्णाचा पत्ता वेगवेगळा

एका मयत रुग्णाचा पत्ता घाटीने अहमदनगर येथील असल्याचे नमूद केले आहे; परंतु हा रुग्ण शहरातील असल्याचे माहिती कार्यालयातर्फे देण्यात आले.. रुग्णांचे पत्ते नमूद करण्यात घोळ होत असल्याची स्थिती पहायला मिळत आहे.