शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'उद्या या, पैसे देतो'; कर्जदात्यांना फोन करून तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 14:13 IST

हिमायतबागेत तरुण लॅब असिस्टंटची आत्महत्या

ठळक मुद्देघरी सांगितले रोशनगेटला जातो रेहानवर अनेकांचे  होते कर्ज.

औरंगाबाद : विषारी औषधचे सेवन करून २३ वर्षीय लॅब असिस्टंटने आत्महत्या केल्याची घटना हिमायतबाग परिसरात मंगळवारी सकाळी उघडकीस आली. तरुणावर अनेकांचे कर्ज होते सोमवारी त्याने सर्वांना कॉल करून तुमचे पैशे उद्या देतो असे सांगितले होते. रेहान खान जाबाज खान,  (२३,रा.टाइम्स कॉलनी, औरंगाबाद) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास  हिमायतबाग मध्ये मॉर्निंगवॉक साठी काही नागरिक जात असताना त्यांना एका झाडाखाली एक तरुण मृतावस्थेत पडलेला दिसला असता नागरिकांनी पोलिसांना कळविले. बेगमपुरा पोलिसांच्या एका पथकाने तातडीने धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली असता तरुणाजवळ एक विषारी कीटकनाशकाची रिकामी बाटली व एक धारदार कटर आढळून आला. तसेच पोलिसांना रेहानची दुचाकी हिमायत बाग च्या प्रवेशद्वारा जवळ मिळाली. यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात हलविले. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रेहानवर अनेकांचे  होते कर्ज.रेहान हा एका खाजगी पॅथॉलॉजी लॅब मध्ये असिस्टंट म्हणून कामाला होता. त्यावर अनेकांचे कर्ज होते. कर्जाची रक्कम सुमारे ५० लाखांवर गेली होती. अनेकजण पैशासाठी त्याकडे तगादा लावत होते. त्याने कालच (सोमवारी) सर्वाना फोन करून, माझं पैस्यांचे काम झालेलं आहे. उद्या सकाळी तुमचे पैसे देतो असे सांगितले होते. 

घरी सांगितले रोशनगेटला जातो सोमवारी दुपारी रोशनगेट ला जाऊन येतो, पैशाचे काम आहे, असे सांगून घराबाहेर पडला होता मात्र तो रात्रभर घरी आलाच नाही.आज सकाळी त्याने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली अशी माहिती रेहानच्या मोठ्या भावाने दिली.