शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

वैजापूर तालुक्यातील सिंचन प्रकल्प ‘कोमात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:23 IST

जवळपास दरवर्षी पाणीटंचाई वैजापूर तालुक्याच्या पाचवीला पुजली आहे. विशेष म्हणजे प्रशासन पाणीटंचाई आराखडे कागदावरच रंगतात आणि कागदावरच ते संपुष्टात येतात, असा अनुभव अनेकदा तालुक्यातील नागरिकांना आला आहे. आजघडीला तालुक्यातील १० सिंचन प्रकल्पांत केवळ १० टक्केच जलसाठा शिल्लक असल्याची चिंताजनक स्थिती समोर आली आहे.

मोबीन खान ।लोकमत न्यूज नेटवर्कवैजापूर : जवळपास दरवर्षी पाणीटंचाई वैजापूर तालुक्याच्या पाचवीला पुजली आहे. विशेष म्हणजे प्रशासन पाणीटंचाई आराखडे कागदावरच रंगतात आणि कागदावरच ते संपुष्टात येतात, असा अनुभव अनेकदा तालुक्यातील नागरिकांना आला आहे. आजघडीला तालुक्यातील १० सिंचन प्रकल्पांत केवळ १० टक्केच जलसाठा शिल्लक असल्याची चिंताजनक स्थिती समोर आली आहे.यामुळे आगामी ३ ते ४ महिने तालुक्यातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. भूजल पातळीही कमालीची खालावली आहे. आता प्रशासन ऐनवेळेवर भविष्यातील पाणीटंचाईवर काय उपाय करते हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.तालुक्यात मार्चच्या पंधरवड्यानंतरच उन्हाळ्याची चाहूल लागते. पुढे एप्रिल, मे अणि जून महिन्यांत ही धग कायम राहते. यंदा मात्र, ‘मे हिट’ तडाखा फेब्रुवारीतच नागरिकांना सहन करावा लागत आहे. रात्री गारवा तर दिवसा सूर्य आग ओकत असल्याने जमिनीतील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे.तालुक्यातील दहा सिंचन प्रकल्पांसह ग्रामीण जलस्रोतांची स्थितीही बिकट आहे. एकूणच तालुक्यात दुष्काळाचे संकट घोंगावू लागले आहे.मात्र, असे असले तरी पंचायत समिती व जिल्हा प्रशासन याबाबत अद्याप गंभीर झालेले दिसत नाही. पंचायत समितीचा पाणीटंचाई आराखडा अद्याप सज्ज झालेला नाही. नवीन विंधन विहिरी व कूपनलिका, नळ योजनेची विशेष दुरुस्ती, सिंचन विहिरींची विशेष दुरुस्ती, तात्पूर्वी पूरक नळ योजना, टँकरने पाणीपुरवठा करणे, विहिरींचे खोलीकरण, गाळ काढणे, इनवेल बोर, खासगी विहिरी अधिग्रहित करणे, विंधन विहिरींचे जलभंजन आदी उपाययोजना गावागावांत करायच्या असतात. मात्र, या उपाययोजनांबाबत अद्यापही कुठला निर्णय पं.स. स्तरावर झालेला नाही.त्यामुळे आगामी काळात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी, लागणार हे जवळपास निश्चित आहे.नारंगी प्रकल्पात२ टक्केच पाणीवैजापूर शहराला नारंगी मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, सध्या या प्रकल्पात केवळ २ टक्के पाणी आहे.च्या प्रकल्पातून शहरासह बाजूच्या ७ ते ८ गावांना सिंचनासाठी पाणी दिले जाते.च्त्यामुळे या प्रकल्पातून झपाट्याने पाण्याची पातळी कमी होते. येत्या काही दिवसांत हा प्रकल्प कोरडा होऊन वैजापूरकरांवर पाण्याचे भीषण संकट ओढऊ शकते.ढेकू तलावही तळालाच्ढेकू तलावाला शेतकºयांचे संरक्षित सिंचन म्हटले जाते. या तलावामुळे ग्रामीण भागातील पाण्याची पातळी टिकून राहते. मात्र, यावर्षी या तलावातही पाण्याचा अत्यल्प साठा शिल्लक आहे.च्यामुळे गावखेड्यांतील पाण्याचे स्रोत झपाट्याने आटत चालले आहेत. पाण्याची पातळी खालावल्याने बोअरवेल, विहिरींची पातळीही घटली आहे.सिंचन प्रकल्पांची आजची स्थितीप्रकल्पाचे नावकोल्ही मध्यम प्रकल्पनारंगी मध्यम प्रकल्पबोरदहेगाव मध्यम प्रकल्पखंडाळा लघु प्रकल्पबिलवणी लघु प्रकल्पसटाणा लघु प्रकल्पगाढे पिंपळगाव लघु प्रकल्पजरुळ लघु प्रकल्पमन्याड साठवण तलाववांजरगाव बंधाराएकूण सरासरीक्षमता (दलघमी)३.२४११.५०११.४७०.४७२०.७६९१.१७१.६२९१.१६३.०१२.१५३६.५९आजचा साठा०.६८२जोता खालीजोता खाली०.०१७जोता खालीजोता खाली०.२२४कोरडे२.५२०.२२५३.६६८टक्केवारी२१.०४२.००---३.५६----१३.७४---८४.००१०.७११०.०३