शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

विसर्जन विहिरीची स्वच्छतेसह रंगरंगोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 22:15 IST

वाळूज महानगर : बजाजनगरात स्वच्छतेसाठी शिक्षक दाम्पत्याने पुढाकार घेतला असून, पाच सोसायटीतील महिला व नागरिकांच्या मदतीने श्री विसर्जन विहिरीची स्वच्छता करुन रंगरगोटी करण्यात आली आहे.

पाच सोसायटींची मदत : स्वच्छतेसाठी शिक्षक दाम्पत्याचा पुढाकारवाळूज महानगर : बजाजनगरात स्वच्छतेसाठी शिक्षक दाम्पत्याने पुढाकार घेतला असून, पाच सोसायटीतील महिला व नागरिकांच्या मदतीने श्री विसर्जन विहिरीची स्वच्छता करुन रंगरगोटी करण्यात आली आहे.

बजाजनगरच्या एमआयडीसी कर्मचारी वसाहतीजवळील कपिलधारा सोसायटीलगत श्री विसर्जन विहिर आहेत. या विहिरीत दरवर्षी परिसरातील गणपतीचे विसर्जन करण्यात येते. एमआयडीसीकडून गणेशोत्सवाच्या प्रारंभी व विसर्जन झाल्यानंतर या विहिरीची स्वच्छता केली जाते. यंदा गणेशोत्सवाच्या सुरवातीला या विहिरीची साफ-सफाई करण्यात आली होती.

मात्र विसर्जनानंतर विहिरीची स्वच्छता न केल्याने ही विहीर कचऱ्याने भरली होती.त्यामुळे परिसरात दुर्गंधीचा त्रास सुरु झाला. सोसायटीतील नागरिकांनी एमआयडीसीकडे स्वच्छतेसाठी पाठपुरावा केला. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने नव्याने वास्तव्यास आलेल्या बळीराम वळसंगे व जयदेवी वळसंगे या शिक्षक दाम्पत्याने पुढाकार घेत विहीर व परिसराची स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला.

या उपक्रमाला ग्रामविकास अधिकारी सविता हत्ते यांनीही प्रोत्साहन देत कल्पना व्यवहारे, अलका दुग्गडल सत्यशिला सोळंके, लक्ष्मी नागरे, सुरेखा पायगव्हाण,प्रभा पेठकर, लता दिवटे, विजया साध्ये, मंगल वळसंगे आदींनी मदतीने स्वच्छता अभियान राबविले.

वर्गणी करुन विहिरीची स्वच्छता व रंगरंगोटीपाच सोसायटींतील नागरिकांनी प्रत्येकी २०० रुपये लोकवर्गणी ३ हजार रुपये जमवून या विहिरीची स्वच्छता केली. यानंतर सोसायटीतील महिलांनी श्रमदान करुन परिसर स्वच्छ केला. यानंतर विसर्जन विहिरीची रंगरंगोटी करुन या ठिकाणी स्वच्छतेची जनजागृती करणारे फलक लावले आहेत. याच बरोबर विहिरीत कचरा टाकणाºयाकडून दंड वसूल करण्याचा निर्णयही सोसायटीतील नागरिकांनी केला आहे.

स्वच्छतादूत बनून जनजागृतीबजाजनगरात या शिक्षक दाम्पंत्याच्यावतीने स्वच्छतेविषयी जनजागृती केली जात आहे. या पाच सोसायटीतील नागरिक व महिला स्वच्छता दूत दररोज एकत्र येऊन परिसराची स्वच्छता करुन कचºयाची विल्हेवाट लावतात. या उपक्रमाला हळुहळु चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

टॅग्स :WalujवाळूजAurangabadऔरंगाबाद