शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रंगात रंगली तरूणाई

By admin | Updated: March 18, 2017 00:02 IST

लातूर : लातूर शहर व जिल्ह्यात रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली़

लातूर : लातूर शहर व जिल्ह्यात रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली़ गतवर्षी जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट होते़ त्यामुळे रंगपंचमीचा उत्साह कमी होता़ यंदा मात्र तरूणाई रंगात न्हाऊन निघाली़ तरूणाईसह आबालवृद्धांनीही रंग खेळला़ विशेष म्हणजे यंदा नैसर्गिक रंगाचा वापर झाला़ केमिकलयुक्त रंग, वार्निस व काचेचे कलर न वापरता तरूणाईने नैसर्गिक रंगाचा उधळण करून जल्लोष साजरा केला़ शहरातील चौका-चौकात डॉल्बीच्या तालावर नृत्यांची धमाल करीत तरुणाई दिवसभर रंगात चिंब रंगली़ चौका-चौकात आणि रस्त्या-रस्त्यांवर तरुणाईच्या जथ्यांनी एकमेकांवर रंगाची मुक्त उधळण केली. भारतीय संस्कृतीनुसार रंगपंचमीचा सण फाल्गुन मासात येतो. याच कालावधीत वसंत ऋतूचे आगमन होत असल्याने या सणाला विशेष महत्त्वाचे स्थान आहे. यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे रंगपंचमीचा उत्साह काही औरच होता. गेल्या तीन वर्षांपासून रंगपंचमीसह इतर सणांना दुष्काळाची किनार होती. त्यामुळे कोरड्या रंगांची उधळण करण्यावर नागरिकांचा भर होता. मात्र, यंदा समाधानकारक आणि मुबलक पाऊस झाल्यामुळे गेल्या चार वर्षांच्या खंडानंतर तरुणाई रंगात चिंब चिंब न्हाऊन निघाली आहे.रंगपंचमीनिमित्त चौका-चौकात रंगाचे पिप भरुन तरुणाई ओलीचिंब झाली. लातुरात गावभागातील सेंट्रल हनुमान, खडक हनुमान, सिध्देश्वर वेस, पटेल चौक, पोचम्मा गल्ली, हत्तेनगर, सुभाष चौक, गंजगोलाई, हनुमान चौक, मिनी मार्केट, शिवनगर, प्रकाश नगर, आदर्श कॉलनी, शिवाजी चौक, गांधी चौक, विवेकानंद चौक, शाहू चौक, नांदेड नाका, मळवटी रोड, बार्शी रोडवरील पाण्याची टाकी, औसा रोडवरील खर्डेकर स्टॉप, संभाजी नगर, खाडगाव रोड, अंबाजोगाई रोडवरील अहिल्यादेवी होळकर, चौक, जुना रेणापूर नाका परिसर, उद्योग भवन परिसर, ठाकरे चौक, कॉईल नगर, कोल्हे नगर, मोतीनगर, कोकाटे नगर, मंत्री नगर, एलआयसी कॉलनी, जुना औसा रोड, विशाल नगर, श्रीनगर, बालाजी नगर, राजीव नगर, इंदिरा नगर, म्हाडा कॉलनी, माताजी नगर, बसवेश्वर चौक, पटेल नगर, कन्हेरी नाका, सुपारी हनुमान, गांधी नगर, बोधे नगर आदीं परिसरात तरुणाईने एकत्र येऊन रंगांची उधळण केली. शाळांनीही रंगपंचमी साजरी केली़