शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

पॉश म्हणवल्या जाणाऱ्या एन-२, एन-३, एन-४ या वसाहतींना समस्यांनी घेरलेय

By साहेबराव हिवराळे | Updated: March 21, 2024 18:28 IST

एक दिवस एक वसाहत: आठ दिवसातून एकदा पाणीपुरवठा, टँकर व जारच्या पाण्यावर भागवावी लागते तहान

छत्रपती संभाजीनगर : अधिकारी, उद्योजक व सधन वसाहती मानल्या गेलेल्या सिडको एन-२, एन-३, एन-४ देखील समस्या मुक्त नाहीत. रस्ते गुळगुळीत दिसत असले तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. महापालिका आठ दिवसातून एकदा पाणी देते अन् पाणीपट्टी एक महिन्याची वसूल करते. त्यामुळे नागरिकांना नाइलाजास्तव टँकर व जारच्या पाण्यावर अतिरिक्त पैसा खर्च करावा लागतो आहे.

नियोजनाचा बोलबाला असलेल्या या वसाहतीमध्ये नियोजनाचा झालेला बभ्रा नागरिकांना गांजणाऱ्या समस्यावरून दिसतो. अनेक ठिकाणी ड्रेनेज व जलवाहिन्या एकमेकांना क्रॉस झाल्यात. दोन्हीपैकी कुठलीही वाहिनी लिकेज झाली की, नागरिकांना दूषित पाण्याचा रतीब टाकला जातो. गेल्या वर्षीपासून या भागात नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी खोदकाम सुरू आहे. पण ते वेळेत काही पूर्ण होत नाही. या खोदकामातून निघालेला मुरूम चक्क येथून उचलून विकून टाकण्यात आला. हे खड्डे भरण्यासाठी माती आणून टाकली. आता ही माती दबून पुन्हा तेथे खड्डे झाले आहेत. ते कोण भरणार, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. या खड्ड्यातून सांडपाणी मुरून जलवाहिनीद्वारे नळास येते.

या वसाहतीत घंटागाडीची फेरीही दोन दिवसाआड होते. त्यामुळे दोन-तीन दिवस कचरा घरात साठवून ठेवावा लागतो. अनेकदा या कचऱ्यामुळे घरातही दुर्गंधी पसरते. हिरवाईने नटलेल्या या वसाहतीमध्ये झाडांचा पालापाचोळाही मोठ्या प्रमाणात निघतो. त्यामुळे घंटागाड्यांनी या वसाहतीत दररोज फेरी मारून कचरा गोळावा करावा, अशी मागणी महिला व नागरिकांकडून होत आहे.

समान पाणी का वाटप नाही...नागरिक रांगेत उभे राहून कर मनपाकडे अदा करतात. मग सिडको एन-२ , ३, ४ परिसराला पुरेसे पाणी दिले जात नाही. ४५ मिनीट पाणीपुरवठा केला जातो. त्यात दूषित पाणी आले तर निर्जळीच होते.- राहुल इंगळे 

काळी माती आली कशी?मंदिराजवळून जलवाहिनी टाकण्यासाठी नवीनच सिमेंट रोड खोदण्यात आला. जलवाहिनी टाकली तीही ड्रेनेज लाइनला क्राॅस करून. येथील मुरूम गायब झाला व आता काळी माती टाकून बुजविणे सुरू आहे. कामाकडे अधिकाऱ्यांचे लक्ष नाही.- मनोज बोरा

घंटा गाडी दररोज हवी...दररोज घरापर्यंत जाऊन कचरा उचलण्याची जबाबदारी दिलेली असताना दोन दिवसाआड घंटा गाडी पाठविली जाते. आमच्यावर जास्त लोड असल्याने दररोज येत नाही, असे सांगून कचरा गाडीवाले तिसऱ्या दिवशी फेरी मारतात. वर्गीकरण केलेल्या कचऱ्याच्या बकेट सांभाळून ठेवाव्या लागतात.- संध्या नारखेडे

जलबेल ॲप पारदर्शक नाही...३० मिनिटे अगोदर पाण्याचा संदेश पाठविला जातो तो संदेश आल्यापासून वाळूजला असलेला व्यक्ती धडपड करीत घरापर्यंत पोहोचतो. पाण्यासाठी एक व्यक्ती दिवसभर घरीच थांबवावा लागतो. कधी जलवाहिनी फुटली तर कधी पाणी पुरवठ्यास उशीर अशा प्रकाराने नागरिक वैतागले आहेत. - मयुरी व्यवहारे

रस्त्यावर अडथळे अधिक...मुलांना शाळेत जातांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. परिसरातून वाहने सुसाट चालविले जातात. यामुळे किरकोळ अपघात होतात. कामगार चौकात वाहतूक पोलिस कायम असावा म्हणजे वाहतूक कोंडी होणार नाही.- अर्चना पाटणी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका