शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
4
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
5
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
6
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
7
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
8
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
9
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
10
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
11
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
12
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
13
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
14
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
15
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
16
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
17
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
18
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
19
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
20
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयांना १० हजार रुपये दंडच नव्हे; विद्यापीठ युवा महोत्सवाचे संपूर्ण शुल्कच घेणार

By राम शिनगारे | Updated: January 14, 2025 19:12 IST

सहभागी न होणाऱ्या महाविद्यालयांवर कोट्यवधींचा दंड

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नुकत्याच झालेल्या केंद्रीय युवा महोत्सवात सहभागी न होणाऱ्या महाविद्यालयांना दहा रुपये दंड आकारण्यात येत होता. मात्र, आता या दंडासोबतच महाविद्यालयांनी युवक महोत्सवासाठी स्वत:कडे जमा करून घेतलेले प्रति विद्यार्थी २५ रुपये शुल्काचे पैसेही विद्यापीठाला द्यावे लागणार असल्याचा निर्णय कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सल्लागार समितीच्या बैठकीत घेतल्याची माहिती विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. कैलास अंभुरे यांनी दिली.

केंद्रीय युवा महोत्सव २५ ते २८ डिसेंबर दरम्यान विद्यापीठात आयोजित केला होता. या महोत्सवासंदर्भात कुलगुरू डॉ. फुलारी यांच्या अध्यक्षस्थेतील सल्लागार समितीची बैठक नुकतीच पार पडली. प्रकुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे, सदस्य सचिव डॉ. कैलास अंभुरे, व्यवस्थापन परिषद सदस्य ॲड. दत्ता भांगे यांच्यासह इतर सदस्यांची उपस्थिती होती. यात महाविद्यालयांवर कारवाईचा बडगा उगारणारे अनेक निर्णय घेतले. महोत्सवात विद्यापीठाशी संलग्न ४७६ पैकी २९१ महाविद्यालयांनी ऑनलाइन नोंदणी केली. १८५ महाविद्यालयांनी त्याकडे दुर्लक्ष केले. या १८५ महाविद्यालयांना प्रत्येकी १० हजार रुपये दंडासोबतच प्रति विद्यार्थ्यांकडून युवा महोत्सवासाठीचे २५ रुपये शुल्कही विद्यापीठ घेणार आहे. त्याशिवाय ऑनलाइन नोंदणी करून प्रत्यक्षात सादरीकरण न करणाऱ्या १०० महाविद्यालयांवरही हीच कारवाई केली. त्यामुळे २८५ महाविद्यालयांना प्रत्येकी १० हजार रुपयांप्रमाणे २८ लाख ५० हजार रुपये दंडासह संबंधित महाविद्यालयातील एकूण प्रवेशित प्रति विद्यार्थ्यांचे २५ रुपये शुल्कही दंड म्हणून विद्यापीठास द्यावा लागणार आहे. त्यामुळे या दंडाची रक्कम लाखांऐवजी कोटीमध्ये जाण्याची अंदाज आहे.

प्राचार्यांसह विद्यार्थी अन् महाविद्यालयांनाही दंडयुवक महोत्सवात उमरगा येथील शिवाजी महाविद्यालय आणि घनसावंगी येथील मॉडेल कॉलेजच्या विद्यार्थी व कलावंतांनी वाद घातला होता. त्यामुळे या महाविद्यालयांच्या प्राचार्यांना प्रत्येक ५० हजार रुपये दंड आणि संबंधित विद्यार्थ्यांना तीन वर्षे तर संघप्रमुखांना तहहयात युवा महोत्सवात प्रवेश बंदी घातली आहे. 

खोटी माहिती देणाऱ्या कॉलेजना प्रति विद्यार्थी १० हजार दंडविद्यार्थ्यांच्या वयासंदर्भात खोटी माहिती देणाऱ्या महाविद्यालयांना प्रतिविद्यार्थी १० हजार रुपये दंड आकारला आहे. त्यामध्ये राजर्षी शाहू महाविद्यालय वाळूजचे २ विद्यार्थी, मॉडेल कॉलेज घनसावंगी २, मत्स्योदरी महाविद्यालय अंकुशनगर १, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स बदनापूर ३, के. टी. पाटील अध्यापक व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालय धाराशिव येथील ३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र