जाफराबाद : तालुक्यातील गारखेडा, सावंगी येथील सर्वोच्च बोली लावून नावे करण्यात आलेला वाळू घाटाच्या ठिकाणी वाळूचे उत्खनन न करता इतर ठिकाणी नियम बाह्य वाळू उत्खनन केल्याप्रकरणी ठेकेदार सय्यद रब्बानी सय्यद बाबू यांच्याकडून ३ कोटी ४४ लाख ३७ हजार ८४० रूपये दंड वसूल करण्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. या कारवाईने वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.महसूल विभाग गौन खनिज कायद्यानुसार ठरवून दिलेल्या ठिकाणी वाळू उपसा होत नाही, अशी तक्रार साहेबराव मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार ६ मे रोजी जिल्हा खनिकर्म अधिकारी, मंडळ अधिकारी, तहसील कार्यालय, तलाठी यांनी वाळूघाटास प्रत्यक्ष भेट देऊन स्थळ पाहणी केली असता लिलावधारक यांनी त्यांना प्रत्यक्षात ताबा दिलेल्या ठिकाणी वाळू न भरता गट नंबर ९६ व १०० मधून २ हजार २७ ब्रास आणि या वाळू घाटालगत गारखेडा, सावंगी शिवारात ७ हजार ७६ ब्रास वाळू उत्खनन केले. ताब्यात नसलेल्या क्षेत्रात ८ हजार ८४ ब्रास अवैधरित्या आढळून आले आहे.शासनाने लिलावधारक साठी विहित केलेल्या १ मीटरच्या खोली पेक्षा जास्त १.५ आणि सावंगी शिवारात २ मीटर जास्तीचे उत्खनन केल्याचे पंचनाम्या दरम्यान दिसून आले. आकारण्यात आलेली दंडाची रक्कम १२ आॅगस्टपर्यंत वसूल करून कोषागारात जमा करावे, असे या आदेशात म्हटले आहे. आकारण्यात आलेली दंडाची रक्कम ठरवुन दिलेल्या काळात न भरल्यास जमीन महसुलीचा थकबाकी म्हणून आरआरसी महसूल वसुली प्रमाणपत्र तयार करून वसुली करण्याकरीता तहसीलदार यांना आदेशीत केले आहे. (वार्ताहर)अवैध वाळू उपसा होत असल्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय यांनी १० मे व १५ जून रोजी अहवाल मागविण्यात आला होता. त्यावर १३ मे, २१ जून रोजी ठेकेदार यांनी अहवाल सादर केला होता. मात्र त्यांनी सादर केलेला खुलासा जिल्हाधिकारी यांच्या सुनावणी दरम्यान अमान्य करत अप्पर जिल्हाधिकारी पी.बी.खपले यांनी हा निर्णय दिला.४आकारण्यात आलेली दंडाची रक्कम १२ आॅगस्टपर्यंत वसूल करून कोषागारात जमा करावे, असे या आदेशात म्हटले आहे. आकारण्यात आलेली दंडाची रक्कम ठरवुन दिलेल्या काळात न भरल्यास जमीन महसुलीचा थकबाकी म्हणून आरआरसी महसुल वसुली प्रमाणपत्र तयार करून वसुली करण्याकरीता तहसीलदार यांना आदेशीत केले आहे.
साडेतीन कोटी दंड वसूल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
By admin | Updated: August 8, 2016 00:38 IST