शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा आमदार अतुल सावे यांच्या कार्यालयाची तोडफोड

By admin | Updated: February 16, 2017 20:10 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दोन दिवसांपूर्वी झालेल्या तोडफोड प्रकरण आज चांगलेच चिघळले आहे. पँथर्स

ऑनलाइन लोकमत औरंगाबाद, दि. 16 - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दोन दिवसापूर्वी झालेल्या तोडफोड प्रकरण आज गुरुवारी चांगलेच चिघळले आहे. पँथर्स सेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपा आमदार अतुल सावे यांचे सिडको एन-७ मधील बजरंग चौकातील कार्यालयावर दगडफेक करुन राडा केला.यावेळी कार्यालयाच्या खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या आणि तेथील फलक तोडण्यात आले. ही घटना दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ११फेब्रुवारी पंडित दिन दयाल उपाध्याय यांच्या पुण्यातिथी निमित्त आयोजित व्याख्यान महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, रमाई यांची पुण्यातिथी साजरी केली नसल्याचा आरोप करत बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावले. याच्या प्रत्युत्तरादाखल भाजयुमो आणि अ.भा.विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेच्या सभागृहाची तोडफोड केली. यावेळी व्याख्यान समर्थक आणि विरोधक यांच्यात हाणामारी झाली होती. या प्रकरणात विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य व आमदार अतुल सावे यांनी बुधवारी उडी घेतली. आ. सावे यांनी कुलगुरु डॉ. बी. ए. चोपडे यांची भेट घेत व्याख्यान उधळून लावणाऱ्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे नोंदविण्याची मागणी करणारे निवेदन दिले. यामुळे पँथर सेनेच्या कार्यकर्त्यांनी आ. सावे यांना लक्ष्य करत गुरूवारी दुपारी त्यांचे बजरंग चौकातील संपर्क कार्यालय फोडले. सुरुवातीला हे कार्यकर्ते आ. सावे यांच्या खडकेश्वर मंदिर परिसरातील कार्यालयावर हल्ला करणार असल्याची कुणकुण आ. सावे यांना लागताच त्यांनी पोलिस संरक्षण मागितले. यामुळे बजरंग चौकातील कार्यालयाच्या खिडक्यांच्या काचा दगड विटाने फोडण्यात आल्या तसेच कार्यालयाबाहेरचे फलकाची पाटी उखडून फेकण्यात आले. यावेळी आरएसएस मुर्दांबाद, अतुल सावे मुर्दाबाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद अशी घोषणाबाजी करीत आणि पत्रके टाकू कार्यकर्ते तेथून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच आ. सावे हे कार्यकर्त्यांसह तेथे दाखल झाले. पोलीस निरीक्षक कैलास प्रजापती आणि कर्मचाऱ्यांनी काही मिनिटात तेथे धाव घेतली. हिम्मत असेल तर समोर या-आ.सावे या घटनेविषयी प्रतिक्रिया देताना आ. सावे म्हणाले की, विद्यापीठाने आयोजित अशोक मोडक यांचे व्याख्यान उधळून लावणाऱ्या  तसेच तेथे धूडगुस घालणाºया संबंधित संघटनेविरोधात गुन्हे नोंदविण्याची मागणी बुधवारी आपण केली. माझा विरोध करण्यासाठी कार्यालय फोडण्यात आले. पाठीमागे हल्ला करण्याऐवजी हिम्मत असेल तर थेट समोर यावे, असे आवाहन त्यांनी हल्लेखोरांना केले. याप्रकरणी हल्लेखोरांविरोधात गुन्हे नोंदविणार असल्याचे ते म्हणाले.