छत्रपती संभाजीनगर: तालुक्यातील कुंभेफळ येथे रविवारी रात्री सर्पदंशाची एक हृदयद्रावक घटना घडली. घरातील जिन्यात खेळत असलेल्या अवघ्या दोन वर्षांच्या शंभू ज्ञानेश्वर दांडगे या चिमुकल्याला विषारी कोब्राने दंश केला. या घटनेत शंभूचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, दांडगे कुटुंबातील एकुलता एक मुलगा गेल्याने गावात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
खेळता-खेळता काळाचा घालामिळालेल्या माहितीनुसार, शंभू रात्रीच्या वेळी घरातील जिन्याजवळ खेळत होता. यावेळी तिथे दबा धरून बसलेल्या कोब्राने त्याच्या उजव्या पायाला दंश केला. शंभू जोरजोरात रडू लागल्याने आईने धावत जाऊन पाहिले असता त्याच्या पायातून रक्त येत असल्याचे दिसले. काही वेळातच त्याची प्रकृती खालावल्याने कुटुंबीयांनी त्याला करमाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी शहरात हलवण्याचा सल्ला दिला. दुर्दैवाने, छत्रपती संभाजीनगरला पोहोचण्यापूर्वीच शंभूचा मृत्यू झाला.
उन्हाळ्यात सर्पदंशाचा धोका वाढलाउन्हाळ्याच्या दिवसांत उष्णतेमुळे साप बिळाबाहेर पडण्याचे प्रमाण वाढते. या घटनेनंतर सर्पमित्र मनोज गायकवाड यांनी त्याच परिसरातून एका कोब्राला पकडून शेंद्रा वनक्षेत्रात मुक्त केले. "घर परिसर स्वच्छ ठेवावा, कचरा साचू देऊ नये आणि साप आढळल्यास सर्पमित्रांना संपर्क साधावा," असे आवाहन त्यांनी केले आहे.
सर्पदंश टाळण्यासाठी खबरदारी परिसर स्वच्छता: घराजवळ लाकडे, विटांचा ढिगारा किंवा कचरा साचू देऊ नका.अंधारात सतर्कता: रात्री घराबाहेर पडताना टॉर्चचा वापर करा.उंदीर-बेडूक नियंत्रण: घरात किंवा परिसरात उंदीर-बेडूक होणार नाहीत याची काळजी घ्या, कारण त्यांच्या शोधात साप येतात.लहान मुलांकडे लक्ष: मुले अडगळीच्या ठिकाणी खेळणार नाहीत याची दक्षता घ्या.
Web Summary : A two-year-old boy in Kumbhefal died after being bitten by a cobra while playing near his home. Despite immediate efforts to get medical attention, he passed away before reaching the hospital. The incident highlights the increased risk of snakebites during summer.
Web Summary : कुंभेफल में दो साल के बच्चे को कोबरा ने काटा, जिससे उसकी मौत हो गई। खेलते समय घर के पास सांप ने उसे काटा। अस्पताल पहुंचने से पहले ही उसने दम तोड़ दिया। यह घटना गर्मियों में सांप के काटने के बढ़ते खतरे को दर्शाती है।