शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

कॉँग्रेस-राष्ट्रवादीत केजला हातमिळवणी

By admin | Updated: May 3, 2015 00:59 IST

केज : नगराध्यक्षपदी कोण? हे साडेतीन महिन्यांपासूनचे कोडे अखेर शनिवारी सुटले. सत्तेच्या काठावर असलेल्या काँग्रेसने राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत सत्तेची गुढी मोठ्या थाटात उभी केली.

केज : नगराध्यक्षपदी कोण? हे साडेतीन महिन्यांपासूनचे कोडे अखेर शनिवारी सुटले. सत्तेच्या काठावर असलेल्या काँग्रेसने राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत सत्तेची गुढी मोठ्या थाटात उभी केली. राष्ट्रवादीच्या टेकूवर काँग्रेसच्या हाती सत्तेचा रिमोट आला असला तरी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष ही महत्त्वाची पदे काँग्रेसने स्वत:कडेच ठेवली. नगराध्यक्षपदी कबीरोद्दीन इनामदार तर उपनगराध्यक्षपदी आदित्य पाटील यांची वर्णी लागली. १७ सदस्यांच्या नगरपंचायतीत काँग्रेसने सर्वाधिक ८, भाजपने ५, राष्ट्रवादीने २ जागा मिळविल्या होत्या. दोन अपक्षांनीही नगर पंचायतीत मुसंडी मारली होती. शनिवारी नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसचे कबीरोद्दीन इनामदार तर भाजपकडून हारूण इनामदार आमनेसामने आले. हात उंच करून मतदान घेण्यात आले. राष्ट्रवादीच्या दोन्ही नगरसेवकांनी काँग्रेसच्या बाजूने ‘हात’ उंच केला. त्यामुळे कबीरोद्दीन यांना १० मते मिळाली. हारूण यांना भाजपचे ५ व १ अपक्ष अशी सहा मते मिळाली. अपक्ष नगरसेवक मुज्जफीर तांबोळी यांच्या पदाला आक्षेप असल्यामुळे त्यांचे मत बंद पाकिटात सील करण्यात आले. न्यायालयीन निर्णयानंतर या मताचा विचार केला जाणार आहे.निवडीनंतर उघड्या जीपमधून कबीरोबद्दीन इनामदार व आदित्य पाटील यांची मिरवणूक निघाली.ग्रा. पं. सदस्य ते नगराध्यक्षनगराध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव होते. काँग्रेसकडून चौघांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यामुळे चुरस वाढली होती. मात्र, कबीरोद्दीन इनामदार यांच्यावर काँग्रेसने विश्वास दाखविला. ३४ वर्षीय कबीरोद्दीन हे यापूर्वी ग्रामपंचायत सदस्य होते. ते बारावी उत्तीर्ण असून पाटील कुटुंबियांचे निकटवर्तीय आहेत. ग्रा.पं. सदस्य ते नगराध्यक्ष अशी भरारी त्यांनी घेतली. विकास हाच ध्यासविकास हाच ध्यास असून विश्वास सार्थ ठरवू, असे खा. रजनी पाटील म्हणाल्या. (वार्ताहर)