शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सहकार विभागाचे पथक करणार शेतकऱ्यांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 00:23 IST

पीक कर्ज : फुलंब्री तालुक्याला ९१ कोटींचे उद्दीष्ट

फुलंब्री : तालुक्यातील शेतकºयांच्या मदतीला सहकार विभाग धावला असून येणारे आठ दिवस अधिकारी, गटसचिव बँका व शेतकºयात समन्वय घडवून आणण्याचे काम करणार असून त्यांना पीक कर्ज वाटप करणार आहेत.फुलंब्री तालुक्यातील बँकांना यंदा ९१ कोटी ७७ लाख रुपये कर्ज वाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. हे कर्ज १ एप्रिल ते ३१ जुलैदरम्यान शेतकºयांना वाटप करणे आवशयक आहे. पण कर्जमाफी करण्यात घोळ झाल्याने बँकांनी यंदाच्या पीक कर्ज वाटप प्रकरणे उशिराने हाताळणे सुरु केले. परिणामी पाऊस पडताच शेतकरी बँकांच्या दारात पीक कर्ज घेण्यासाठी चकरा मारू लागले. ज्या शेतकºयांची कर्जमाफी झालेली आहे, त्यांनाच नवीन कर्ज देण्याचे धोरण असल्याने तालुक्यात आतापर्यंत कर्जमाफी केवळ पन्नास टक्केच शेतकºयांना मिळाली. त्यामुळे पीक कर्जही ५० टक्केच शेतकºयांना मिळेल.पीक उगविले तरी कर्ज मिळेनाआजपर्यंत केवळ ३० टक्केच शेतकºयांना खरीपासाठी पीक कर्ज मिळाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला. परिणामी शेतकºयांनी दुकानदारांकडून उधारीवर बियाणे, खते आणली. पिके उगून आली तरी कर्ज मिळत नसल्याचे चित्र तालुक्यात आहे. तालुक्यात पीक कर्ज मिळालेल्या शेतकºयांची संख्या केवळ ३० टक्केच असून याविषयी शेतकºयांत नाराजी पसरलेली असताना सरकारला उशिराने जाग आली. त्यांनी संबंधित विभागाला आदेश दिल्याने आता शेतकºयांना कर्ज मिळण्यासाठी येणाºया अडचणी सोडविण्याची कामे सुरु झाली आहेत. फुलंब्री तालुक्यात ४ राष्ट्रीयीकृत, ३ ग्रामीण तर १३ शाखा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आहेत.पथक स्थापनयासाठी नेमलेल्या पथकात सहायक सहकार निबंधक परमेश्वर वरखडे हे पथकप्रमुख असून सहकार अधिकारी आर.आर. दंडगव्हाळ, लेखापरिक्षक एस. आर. जाधव, कर्ज अधिकारी एस.एन. कोलते, सहकार अधिकारी एन. एफ. जाधव हे पथकात सदस्य आहेत. हे पथक तहसीलदार संगीता चव्हाण यांनी स्थापन केले आहे.२७ गटसचिव लागले कामालातालुक्यात २७ गटसचिव असून ते सर्व जण ११ ते १७ जुलैपासून नेमलेल्या गावात जाऊन शेतकºयांच्या भेटी घेत आहेत. जे शेतकरी कर्जमाफीत बसलेले असताना त्यांना नवीन कर्ज भेटलेले नाही, अशा शेतकºयांचे सर्वेक्षण करून आपल्या अधिकाºयांना अहवाल सादर करणार आहेत. हा सर्व अहवाल १७ जुलै रोजी तहसीलदारांना सादर केला जाणार आहे. त्यानंतर तालुक्यातील कर्जवाटपाचे चित्र समोर येईल.

टॅग्स :bankबँकFarmerशेतकरी